Header AD

भाजपाच्या वतीने गांधी नगर आनंद नगर परिसरात मोफत गरबा वाटप

डोंबिवली  |  शंकर जाधव   :  जगावर कोरोनाचे संकट आले असतान आपली परंपरा, संस्कृती जपली जात आहे. ज्याप्रमाणे गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला त्याप्रमाणे नवरात्रोत्सवहि साजरा होत आहे. यासाठी भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांच्यावतीने डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर-आनंदनगर परिसरात घटस्थापणेसाठी गुजराथी समाजातील भगिनींसाठी मोफत गरबा वाटप करण्यात आले.माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,आणि डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष नंदू जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला.


यावेळी साउथ सेलचे जिल्हा अध्यक्ष मोहन नायर,युवा मोर्चा डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर,वर्षा परमार,उन्नीकृष्णन अय्यर,मंदार जोशी,सुधीर माळगावकर,भानुप्रसाद सिंग,सुभाष फुलोरे,संतोष बगेरा,निलेश सारंग,सुरेश रामन,सुशील मिश्रा,मनोज परब, वॉड अध्यक्ष सचिन माने आदि उपस्थित होते.यावेळी गुजरथी भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.याप्रसंगी शशिकांत कांबळे म्हणाले, जगावर कोरोनाचे संकट आले आहे. मात्र आपण सर्वजण सण साजरे करतो.कारण आपली संस्कृती आणि धर्म टिकला पाहिजे, त्यात खंड पडता कामा नये.पंढरीनाथ म्हात्रे यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक कामे करून जनतेला सहकार्य केले. परिसराती जंतुनाशक फवारणी आणि गरीब नागरिकांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य शिबीर भरवून त्यांना आवश्यक ती मदत केली.

भाजपाच्या वतीने गांधी नगर आनंद नगर परिसरात मोफत गरबा वाटप भाजपाच्या वतीने गांधी नगर आनंद नगर परिसरात मोफत गरबा वाटप Reviewed by News1 Marathi on October 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads