Header AD

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांचा भाजपा कल्याण जिल्हा दौरा


भाजयुमो तर्फे "आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे अँपचे" होणार होणार...


 

डोंबिवली  |  शंकर जाधव  :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाकांक्षी संकल्पना देशामध्ये सुरू केली आणि आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना दिल्या गेल्या आहेत.  भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून या सर्व योजना युवा तसेच जनसामान्यांपर्यंत पोहाचाव्या या करिता भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पेतून आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राची प्रत्येक जिल्ह्यात सुरुवात करण्यात येणार आहे. भाजपा कल्याण जिल्ह्यात आरती देशमुख संयोजक म्हणून काम पाहणार असून इतर  ९ जण सहसंयोजक म्हणून काम पाहणार असून भाजयुमो जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई ह्यांच्या नेतृत्वात ही टीम काम करणार आहे.या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध योजनात्यासाठी लागणारी सर्व माहितीत्यासाठी लागणारे फॉर्म्स आणि सर्व योजनांचा लाभ कुठून व कसा घ्यावा या संदर्भातील विस्तृत माहिती या केंद्राच्या माध्यमातून पुरविली जाणार आहे. लवकरच भाजयुमो तर्फे `आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे अँपचे`उदघाटन होणार असून समाजातील सर्व घटकांपर्यंत आत्मनिर्भर भारत या अभियानातील सर्व योजनांचा लाभ पोहचविण्याचे काम करेल. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील ह्यांनी  डोंबिवली प्रवासात स्फूर्ती स्थळ येथे भेट देऊन स्मारकाचे अभिवादन केले. पै फ्रेंड्स लायब्ररी येथे भेट दिली आणि 'मला भावलेले पुस्तकह्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले. मिहिर देसाई ह्यांच्या माध्यमातून डॉ.अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून वाचकांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. डोंबिवली प्रवासात मंडल अध्यक्ष अमित चिकणकरसमीर भंडारीमितेश पेणकर ह्यांनी स्वागत केले. कल्याण शहरटिटवाळा शहर येथे कार्यकर्त्यांना भेटून संघटनात्मक घोषणा करण्यात आल्या. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश कार्यालयय मंत्री आनंद जोशीप्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाणदेवेश पाटीलपरेश गुजरेप्रदेश सचिव प्रसाद कोडीयालप्रदेश युवती संयोजक मीना केदार हे ह्या दौऱ्यात उपस्थित होते.


भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांचा भाजपा कल्याण जिल्हा दौरा भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांचा भाजपा कल्याण जिल्हा दौरा Reviewed by News1 Marathi on October 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads