Header AD

भारतीय शेअर बाजार निर्देशांकांत १% ची वाढ
मुंबई, १९ ऑक्टोबर २०२०  :  आज भारतीय बाजार निर्देशांकानी वित्तीय, मेटल आणि एफएमसीजी स्टॉक्सच्या नेतृत्वात सलग दुस-या दिवशी वाढ नोंदवली. निफ्टीने ०.९४% किंवा ११०.६० अंकांची वृद्धी घेतली व तो १२,००० अंकांच्या पातळीजवळ म्हणजेच ११,८७३.०५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.१२% किंवा ४४८.६२ अंकांनी वाढला व ४०,४३१.६० अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १४७० शेअर्सनी वृद्धी घेतली तर ११५० शेअर्स घसरले. तर १४८ शेअर्स स्थिर राहिले.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात आयसीआयसीआय बँक (५.०१%), अॅक्सिस बँक (४.२०%), नेस्ले (४.४७%), एसबीआय (४.११%), आणि गेल (४.१७%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे डिव्हिस लॅब (३.७५%), आयशर मोटर्स (३.०४%), हिरो मोटो (२.७०%), सिपला (२.३६%), आणि बजाज ऑटो हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


निफ्टी फिन सर्व्हिस, निफ्टी मेटल आणि निफ्टी एफएमसीजीनंतर निफ्टी बँक हे चांगली कामगिरी करणारे सेक्टर ठरले. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो आणि आयटी सेक्टर्सनी लाल रंगात कामगिरी केली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉल कॅप अनुक्रमे ०.५८% आणि ०.४३% नी वधारले.


बँक ऑफ महाराष्ट्रा लि.: बँक ऑफ महाराष्ट्रा लि. कंपनीचे स्टॉक्स ७.१७% नी वाढले व त्यांनी ११.९५ रुपयांवर व्यापार केला. बँकेचा निव्वळ नफा १३.४% नी वाढला व १३०.१ कोटी रुपये झाला. तसेच बँकेचे निव्वळ उत्पन्न ४.४% नी वाढले व ते ११२०.४ कोटी रुपये झाले.


अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लि.: अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. कंपनीचे स्टॉक्स ५.७९% नी वाढले व २०९९ रुपयांवर स्थिरावले. कंपनीने उत्पन्नात महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्याचे नोंदवल्यानंतर हे परिणाम दिसले. डी मार्ट रिटेल चेन ऑपरेटरने २०२१ या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीत १९८.५४ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे नोंदवले.


डीएचएफएल: कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी चार जणांनी बोली लावली. त्यानंतर देवान हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल) कंपनीचे स्टॉक्स ९.९२% नी वाढले व त्यांनी १३.८५ रुपयांवर व्यापार केला.


फेडरल बँक लि.: बँकेने सप्टेंबरमधील तिमाहित नफ्यात २६.२% घसरण दर्शवली. तर निव्वळ मालमत्ता मूल्यही सुधारले. हे मूल्य २.८४% नी वाढले तर वित्तवर्ष २०२१ च्या दुस-या तिमाहीत एनपीए ०.९९% नी घसरले. त्यानंतर बँकेचे स्टॉक्स ७.४७% नी वाढले व त्यांनी ५६.१० रुपयांवर व्यापार केला.


ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.: ग्लेनमार्क फार्मा कंपनीने यूएसएफडीएकडून सिरोलिमस टॅबलेट्स या रॅपाम्यूनच्या जेनेरिक व्हर्जनसाठी अंतिम मंजूरी मिळवल्यानंतरही कंपनीचे स्टॉक्स २.५३% नी घसरले व त्यांनी ४७८.५० रुपयांवर व्यापार केला.


भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात आजच्या सत्रात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ६ पैशांनी घसरण घेत ७३.४० रुपयांचे मूल्य कमावले.


जागतिक बाजार: जगभरात वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे गुंतवणुकदारांच्या जोखिम घेण्याच्या प्रमाणावरही परिणाम झाला. त्यामुळे जागतिक बाजाराने संमिश्र संकेत दिले. नॅसडॅकने ०.३६% ची तर एफटीएसई १०० ने ०.२२% ची घसरण घेतली. तर दुसरीकडे एफटीएसई एमआयबी , निक्केई २५ आणि हँगसेंग कंपनीचे स्टॉक्स अनुक्रमे ०.१५%, १.११% आणि ०.६४% नी वधारले.

भारतीय शेअर बाजार निर्देशांकांत १% ची वाढ भारतीय शेअर बाजार निर्देशांकांत १% ची वाढ Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads