Header AD

ठाण्यात बिबट्याच्या तावडीतून भटक्या कुत्र्याची वन अधिकाऱ्यांनी केली सुटका
ठाणे  | प्रतिनिधी  :  ठाण्यातील पातलीपाडा घोडबंदर रोड भागात बिबट्याने भटक्या कुत्र्यावर शनिवारी रात्री हल्ला केल्यावर वन अधिकाऱ्यांनी त्या भागात नागरिकांनी सुरक्षित उपाय काय काय करायचे असे बॅनर लावून तेथील लोकांन मध्ये जागरूकता निर्माण करून सूचना दिल्या वन अधिकारी संदीप मोरे असे म्हणाले आहे की आजपर्यंत बिबट्या अन्न शोधण्यासाठी आले असता  हल्ला करतात. शनिवारी रात्री बिबट्याने पाटलीपाडा परिसरातील महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड) स्टोअरजवळ येऊन एक भटक्या कुत्र्याला पळवून नेले. 
स्टोअरमध्ये तैनात असलेले सुरक्षारक्षक अभिलाष डावरे यांच्यासह महावितरण कार्यालयातील तरुणांनी एका आठवड्यापूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या या सात पिल्लांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करत पुढील संगोपनासाठी साठी या पिल्लांना एका सामाजिक संस्थे कडे देण्यात आले आणि डावरे यांनी या पिल्लांना दत्तक घेण्याविषयी ठाणेकरांना आवाहन केले आहे व यांनी वनक्षेत्र हल्ल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली त्याने बिबट्याचे पगमार्कही पुरावे म्हणून दाखवले.आणि वन अधिकारी संदीप मोरे आणि पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तेथील नागरिकांना सुरक्षेचे उपाय सांगून लहान मुलांना अंधार पडल्यावर बाहेर सोडू नये अशा सूचना देखील दिल्या आणि या घटनेवर लक्ष ठेऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
ठाण्यात बिबट्याच्या तावडीतून भटक्या कुत्र्याची वन अधिकाऱ्यांनी केली सुटका ठाण्यात बिबट्याच्या तावडीतून भटक्या कुत्र्याची  वन अधिकाऱ्यांनी केली सुटका Reviewed by News1 Marathi on October 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण परिमंडलात वीजबिलाची थकबाकी पोहचली ६०० कोटींवर

  ■वर्षभरापासून बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होतोय   खंडित.... कल्याण , कुणाल  म्हात्रे :   महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल थकबा...

Post AD

home ads