मोबाईल दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तिघांना २४ तासांत अटक
डोंबिवली | शंकर जाधव : कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने २४ तासांत मोबाईल दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तिघांना २४ तासांत अटक करून जेरबंद केले.या तिघांकडे चोरी साठी वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांनी हस्तगत केली .टिळक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रात्रीच्या वेळी श्रीशा मोबाईल दुकानाचे शटर उचकटून चोरी केली होती.पोलीस हवालदारदत्ताराम भोसले यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की तीन इसम MHO5-BG-4885 या रिक्षात आयरे गाव रेल्वे पटरी जवळ आहेत. त्यांच्याकडे पिशवीत बरेचसे मोबाईल असून ते विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत गुन्हे शाखा युनिट-3 चे वपोनि संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक नेमून आयरेगाव भागात डोंबिवली पूर्व येथे सापळा रचून सदर रिक्षा व मोबाईलसह 3 इसमांना पकडले त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त् राहुल गोरक्षनाथ ननावरे वय २१ वर्षे रा.आयरे गाव डोंबिवली पूर्व, राहुल जगन्नाथ पाल वय १९ वर्षे रा.सदर व एक बालक यांना ताब्यात घेतले.

Post a Comment