रस्ता आगासन गावा बाहेरूनच घ्या,स्थानिक ग्रामस्थ भूमिकेवर ठाम
ठाणे | प्रतिनिधी :- आगासन रस्ता बाधीत शेतकऱ्यांनी ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेत शेतकरी व स्थानिकांच्या समस्या सांगितल्या. कोणत्याही स्थितीत गावातून रस्ता न नेता तो गावा बाहेरून न्यावा असे गावकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला सांगितले. स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या पुढाकाराने व आगासन गाव बचाव संघर्ष समिती चे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्यासह ग्रामस्थांनी आपली भूमिका प्रशासनाला सांगितली.
मनसे आमदार राजू पाटील यांनी मागे आगासन गावात येऊन सदर जागेची पाहणी केल्यावर आगासन वासीयांना आश्वासन दिले होते, महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन सदर विषय आपण आयुक्तांसोबत चर्चा करून मार्गी लावण्याच्या प्रयत्न करू. त्या आश्वासनानुसार आज ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन, सदर रस्ता आणि पूल खाडी समांतर नेऊन, पुलाची दिशा थोडी बदलून आपल्याला मार्ग काढता येईल असं अतिरिक्त आयुक्त यांनी आश्वासन दिले असल्याचे आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले.जोपर्यंत ग्रामस्थांना समाधान होत नाही तोपर्यंत रस्ता होणार नाही , असेही प्रशासनाने सांगितले असल्याचे मुंडे म्हणाले.ही बैठक आमदार राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आगासन गाव बचाव संघर्ष समिती अध्यक्ष *रोहिदास मुंडे, उदय मुंडे, चिंतामण मुंडे,हरिष जोशी, किशोर पाटील, निलेश मुंडे, मनोहर बेडेकर, तुषार पाटील(दिवा) प्रशांत आंबोनकर, विजय वायदंडे,दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश अहिर,संजय कदम कार्यकारी अभियंता दिवा,प्रशांत फाटक,धनंजय मोदे, अनिल पाटील उपअभियंता,सुधीर गायकवाड* हे सर्वजण उपस्थित होते.
रस्ता आगासन गावा बाहेरूनच घ्या,स्थानिक ग्रामस्थ भूमिकेवर ठाम
Reviewed by News1 Marathi
on
October 06, 2020
Rating:

Post a Comment