Header AD

पोलिसांच्या समयसूचकतेमुळे १३ वर्षीय मुलाची घरवापसी

 


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : १३ वर्षीय मुलगा वडील रागविल्यांचा राग मनात धरून घर सोडुन जात होता. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या तीन मिनिटात एक्स्प्रेस चेक करीत मुलाला शोधत वडीलाकडे सुपुर्द केले आहे.   


       कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मिक शार्दूल यांना पो लीस नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली होती की, “पालघर मध्ये राहणारा एक  १३ वर्षीय मुलगा अजमेर म्हैसूर या एक्सप्रेस गाडीने जाण्यास निघाला आहे”. ही माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांच्या हाती केवळ दहा मिनिटांचाच अवधी होता.  पुढच्या दहा मिनिटात कल्याण रेल्वे स्थानकात अजमेर म्हैसूर   एक्सप्रेस गाडी येणार होती. कल्याण लोहमार्ग पोलीस अधिकारी डी.आर. साळवे हे पोलीस पथकासह रात्री १२.३० वाजता स्थानकात सज्ज झाले.


     ही गाडी कल्याण स्थानकात केवळ चारच मिनिटे थांबते. त्यामुळे पोलिसांजवळ फक्त चार मिनिटांचा अवधी होता. मुलाच्या पालकांनी मुलाचा फोटो पोलिसांना व्हॉटस अँपवर पाठवला होता. गाडी स्थानकात येताच पोलिसांनी गाडीचा ताबा घेतला. मुलाचा शोध घेतला. पोलिसांकडे असलेला मुलाचा फोटा पाहून त्यांनी एका १३ वर्षीय मुलाला हटकले. तेव्हा त्याने तो काकासोबत बाहेर जात असल्याचे सांगितले. फोटोतील मुलगा हाच असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.


       अभ्यास न करता सतत गाणी पाहतो.अभ्यास करीत नाहीया कारणास्तव वडील रागावले म्हणून तो मुलगा निघून गेला होताअशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे असल्याचं पोलीस निरिक्षक योगेश देवरे यांनी सांगितलं लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या तीन मिनिटांत या मुलाला शोधून काढले आहे. मुलाचे नाव अनुव्रत त्रिपाठी आहे. मुलाचे वडील राजेश त्रिपाठी यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. पालक आल्याने पोलिसांनी मुलाला पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पालकांना आपला मुलगा पोलिसांनी सुखरूप दिल्याने पालकांचा जीवात जीव आल्याचा आनंद यानिमित्ताने दिसला आहे.


पोलिसांच्या समयसूचकतेमुळे १३ वर्षीय मुलाची घरवापसी पोलिसांच्या समयसूचकतेमुळे १३ वर्षीय मुलाची घरवापसी  Reviewed by News1 Marathi on October 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads