डोंबिवलीत शिवसेने कडून मोदी सरकार आणि युपी सरकारचा निषेध
डोंबिवली | शंकर जाधव : उत्तर प्रदेश हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर चार तरुणांनी केलेल्या अमानुष अत्याचार व पाशवी बलात्कारामुळे तिचा दु:खद मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापली लाट पसरली आहे. डोंबिवलीतहि शिवसेनेने मोदी सरकारचा आणि युपी सरकारचा जाहीर निषेध केले.यावेळी शिवसैनिकांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ असलेल्या पत्रकारांनाही युपीमधील पोलिसांनी आडकाठी आणली.शिवसेनेने पिढीत मुलीच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने १ कोटी रुपये द्यावे आणि आरोपीना लवकरात अटक करावी अशी मागणी केली आहे.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थळवळ, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण –डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, डोंबिवली पश्चिम संघटक किरण मोंडकर,माजी नगरसेवक तात्या माने, संजय पावशे, किशोर मानकामे, बाळा म्हात्रे,संतोष चव्हाण,अभिजित थळवळ,सतीश मोडक,समीर फाळके,मनोज वैद्य, गणेश सरवणकर, संजय मांजरेकर, विवेक खामकर, आदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभाग झाले होते. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी युपिमधील घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला.युपी सरकारने या प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचे वैशाली दरेकर यांनी यावेळी सांगितले. तर उपजिल्हाप्रमुख सदानंद थळवळ म्हणाले, युपीमधील भाजपच्या सरकारमध्ये अशी अमानुष घटना तरी हे सरकार शांत का आहे ? या सरकराचा निषेध आहे.

Post a Comment