Header AD

कल्याण मध्येही भाजपाला खिंडार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळींचा भाजपाला रामराम

  

 

शेकडो एकनाथ खडसे समर्थक करणार राष्टवादीत प्रवेश....


कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :  माजी मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून कल्याण मध्येही भाजपाला खिंडार पडल्याचे चित्र दिसत आहे.  युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळीं यांनी भाजपाला रामराम ठोकला असून शेकडो कार्यकर्त्यांसमवेत एकनाथ खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

     

भाजपाने सतत अन्याय केल्याने भाजपाचा राजीनाम देत असल्याचे एकनाथ खडसे यांनी आज जाहीर करताच खडसे समर्थक देखील भाजपाला सोडचिट्ठी देत आहेत. याचेच लोण कल्याणमध्येदेखील पसरले असून कल्याण मधील गेल्या १९ वर्षापासून भाजपात कार्यरत असलेले, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळीं यांनी देखील भाजपाचा राजीनाम देत एकनाथ खडसे यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्त्यांसोबत  राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. 


एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाला असून भाजपा कल्याण डोंबिवली जिल्ह्यात हिटलर शाही सुरु आहे. पक्षात प्रामणिक पणाला किमत नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचे  तिकीट डावललं, परिवहन सदस्य पद दिलं नाही, नवीन आलेल्यांना ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच पदं दिली जात असल्याचा आरोप प्रशांत माळी यांनी केला आहे.

     

यामुळे कल्याण डोंबिवली जिल्हा संघटक विलास रंदवे, भाजपा प्रभाग व शहर पदधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे माळी यांनी सांगितले आहे. तर माळी यांच्या राजीनाम्यामुळे कल्याण मध्ये भाजपाला खिंडार पडणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. 

कल्याण मध्येही भाजपाला खिंडार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळींचा भाजपाला रामराम कल्याण मध्येही भाजपाला खिंडार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत माळींचा भाजपाला रामराम  Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads