Header AD

महामारी विषयी चिंता वाढल्याने सोन्याच्या दरात सोन्याच्या दरात वृद्धी

 


मुंबई, २६ ऑक्टोबर २०२० : साथीच्या आजाराविषयी चिंता वाढल्याने मागील आठवड्यात सोन्याने ०.१ टक्क्यांनी वृद्धी घेतली. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून मिळणा-या अतिरिक्त मदतीबाबत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदारांमध्ये पिवळ्या धातूबद्दल आकर्षण दिसून आले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की अमेरिकेचे हाऊस स्पीकर नँसी पेलोसी यांनी अमेरिकेच्या डॉलरचे अवमूल्यन झाल्याचे तसेच नव्या कोरोना विधेयकबाबत चर्चा पुढे सुरू ठेवल्याचे वृत्त नोंदवले. मात्र प्रत्यक्ष कराराबाबत काहीही चिन्ह नसल्याने सोन्याच्या दरांबाबत सावधगिरी बाळगली गेली.


महागाई आणि चलन अवमूल्यन रोखण्यात सोने उपयुक्त ठरते. त्यामुळे २०२० मध्ये सोन्याने २५ टक्के वृद्धी दर्शवली. कमी व्याजदर आणि जागतिक बँकांनी अतिरिक्त तरलता आणल्याने ही वृद्धी दिसून आली. जागतिक कोरोना रुग्णसंख्येने ४१.७ दशलक्षांचा आकडा ओलांडला. त्यामुळे सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडील कल वाढला. तसेच युरोपमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्याने पिवळ्या धातूला आधार मिळाला. तथापि, अतिरिक्त कोरोना मदतनिधीच्या कराराचे निश्चित चिन्हे दिसत नाही. त्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या दरांमध्ये फार सुधारणा होणार नाही, असा अंदाज आहे.
महामारी विषयी चिंता वाढल्याने सोन्याच्या दरात सोन्याच्या दरात वृद्धी महामारी विषयी चिंता वाढल्याने सोन्याच्या दरात सोन्याच्या दरात वृद्धी Reviewed by News1 Marathi on October 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads