Header AD

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रकृती स्थिर असून चाहत्यांनी काळजी करू नये गौतम सोनवणेमुंबई  |  प्रतिनिधी  :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आज कोविड चाचणी चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यांची प्रकृती स्थिर आहे.कोरोनाची  अल्प लक्षणे असल्याने ते  एका खाजगी रुग्णालयात कॉरणटाईन झाले आहेत.  कार्यकर्त्यांनी ; चाहत्यांनी  अधिक काळजी करू नये. त्यांनी मुंबईत येऊन ना. रामदास आठवले यांना  भेटण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे. ना. रामदास आठवले सध्या  विलगिकरणात राहून विश्रांती घेत आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत.रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइं च्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.गो कोरोना चा  जगप्रसिध्द नारा देणारे केंद्रियराज्यमंत्री  रामदास आठवले हे झुंझार लढाऊ संघर्षनायक आहेत.ते कोरोनावर मात करून नक्की चांगले होतील अशी प्रार्थना चाहत्यांची असून ना. रामदास आठवले यांच्या पाठीशी पुण्यबळ आहेत.गरिबांचे आशीर्वाद त्यांचे रक्षण करतील. ते कोरोनावर मात करून पुन्हा गोरगरिबांच्या बहुजनांच्या देशाच्या सेवेत हसतमुखाने हजर राहतील अशी प्रार्थना  लाखो चाहत्यांनी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी आपण आहे त्याचा गावातून घरातून ना.रामदास आठवले यांची प्रकृती लवकर चांगली व्हावी यासाठी शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले आहे.
 
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रकृती स्थिर असून चाहत्यांनी काळजी करू नये गौतम सोनवणे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रकृती स्थिर असून चाहत्यांनी काळजी करू नये गौतम सोनवणे Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण रेल्वे स्‍थानक परिसरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने रिक्षा व फेरीवाल्यांचे नियोजन करणार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एसकेडिसीएल मार्फत सॅटिस प्रकल्पांतर्गत विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यापू...

Post AD

home ads