Header AD

शास्त्रीनगर रुग्णालयात अद्ययावत लॅबचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन


आजपासून 32 स्लाईस सिटी स्कॅन मशिनच्या सहायाने 24 तास अल्पदरात सि.टी. स्कॅन सुविधा सुरु करण्यात येत आहे. सदर ठिकाणी प्रति दिन 70 ते 80 सि.टी. स्कॅन क्षमतेने सुविधा उपलब्ध असेल. सदर सेंटर येथे टेले रिपोर्टींग सुविधा उपलब्ध असून ब्रेन सिटी स्कॅनचा अहवाल 01 तासात तर इतर सिटी स्कॅनचा अहवाल 03 तासात उपलब्ध करुन दिला जाणार आहे....


डोंबिवली | शंकर जाधव  : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात अद्ययावत लॅबची निर्मिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका आणि क्रष्णा लॅब प्रा. लि., यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या लॅबमध्ये सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआर आय अशा अद्ययावत चाचण्या होणार आहेत. या चाचण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर आकारले जाणार आहेत. पालिका परिक्षेत्रातील अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असल्याने आता ठाणे, मुंबई जाण्याची गरज रूग्णांना पडणार नाही असे प्रतिपादन नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे उदघाटनप्रसंगी बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर भाजपा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, क्रष्णा लॅबच्या डॉ. पल्लवी जैन, पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सदानंद थरवळ, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, विश्वनाथ राणे,  शैलेश धात्रक यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.


यावेळी शिंदे पुढे म्हणाले, कोविड - 19 मुळे प्रारंभी अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु सर्वांच्या सहकार्याने कोविड-19 पासून संरक्षण होण्यासाठी कोविड हॉस्पिटल उभी केली. यामध्ये ऑक्सिजन सुविधा, आयसीयू बेड सहित व्हेंटिलेटर बेड निर्मिती केल्यामुळे कोविडवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो. यासाठी येथील खाजगी तसेच सरकारी डॉक्टर तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ठाण्यातही मोठे कोविड अद्ययावत रुग्णालय केवळ 24 दिवसात उभे केले त्याबद्दल आजची सर्वजण प्रशंसा करीत आहेत. हे सर्व सर्वांच्या सहकार्यामुळे झाले आहे.


शास्त्रीनगर येथील ही लॅबही लौकिक वाढवेल अशीच व्हावी ही इच्छा आहे. क्रष्णा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची काळजी घ्यायला पाहिजे. पालिका प्रशासन गटारे, पायवाट या मुलभूत सुविधांपर्यंत न थांबता जबाबदारीचे भान राखून ही मोठी सुविधा आता उपलब्ध झाली आहे, सुतिकागृह येथे देखिल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कसं होईल यासाठी पाठपुरावा करावा, अशाही सुचना शिंदे यांनी दिल्या.


या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासणीचे दर कमी असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील गरीब, गरजू लोकांना निश्चितच मदत होईल असे महापौर विनिता राणे म्हणाल्या तर  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक सुविधा शास्त्रीनगर रुग्णालयात नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध होत आहेत, या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव संजय जाधव यांनी केले.


शास्त्रीनगर रुग्णालयात अद्ययावत लॅबचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन शास्त्रीनगर रुग्णालयात अद्ययावत लॅबचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads