त्या तरुणाने वाचवले १४ कुटुंबीयांचे जीव कोपरगावातील ४० वर्ष जुनी धोकादायक `मैना व्हिला`कोसळली
डोंबिवली | शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारत हा गंभीर विषय आहे.पालिका प्रशासन अश्या इमारतींना धोकादायक घोषित इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांना घरे खाली करण्याचे निर्देश देतात.परंतु इमारतीतील रहिवाश्यांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय देत इमारत खाली करून पडत नाहीत.याकडे मात्र पालिका आयुक्त आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचे लक्ष नसल्याने अश्या इमारतीतील रहिवाश्यांना जीव मुठीत घेऊन रहावे लागते. डोंबिवलीजवळील को
कोपरगावातील चारुबामा शाळेच्याजवळ ४० वर्षे जुनी धोकादायक तीन मजली इमारत गुरुवारी पहाटे अचानक कोसळली. इमारतीतील रहिवाशी कुणाल मोहिते या तरुणांच्या तत्परतेमुळे इमारतीतील १४ कुटुंबियांचे जीव वाचले. या दुर्दैवी घटनेत सुदैवाने जरी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सर्व कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. इमारतीतील कुटुंबियांचे समान बेचिराख झाल्यामुळे सर्वजण रस्त्यावर आले आहेत.
कोपरगावचे माजी नगरसेवक तथा परिवहन सदस्य संजय पावशे यांनी दुर्दैवी कुटुंबियांच्या तात्पुरत्या राहण्याची तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची सोया केली आहे. महापालिकेचे "ह" प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्यासह पालिका कर्मचारी तसेच आपत्कालीन पथकांनी पहाणी करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. `मैना व्हीला` इमारतीतील कुणाल मोहिते या तरुणाच्या सर्कतेमुळे इमारत कोसळण्यापूर्वीच ती रिकामी करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. इमारतीत १४ कुटूंब वास्तव्यास होते. कुणाल मोहिते पहिल्या माळ्यावर राहत होता. गुरुवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास कुणाल मोहिते हा तरुण अचानक जागा झाला. तो घरातील किचनमध्ये गेला असता तिथे स्लॅबचा काही भाग कोसळला होता. कुणालने याची माहिती घरच्या लोकांना सांगितली. त्यानंतर कुणाल आणि त्याचे नातेवाईक इमारतीबाहेर पडले. कुणालने दुसऱ्या व्यक्तीचा मादीतने बिल्डिंगमधील सर्व लोकांना जागे केले. सर्व चौदा कुटुंब इमारतीबाहेर पडले आणि थोड्याच वेळात संपूर्ण इमारत कोसळली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित असून उर्वरित इमारत तोडण्याचे काम सुरु आहे. कल्याण डोंबिवली महानगरात पालिका परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत, प्रशासनाने नोटीस बजावण्याशिवाय इमारत मालक इमारतींचे रिपेरिंग करीत नाहीत त्यामुळे अशा इमारतींमधील राहिवासीयांचे जीवन धोक्यात आले आहे. "मैना व्हिला" या इमारतीला पाच वर्षांपूर्वीपासून नोटीस बजावली जात आहे पण मालकाने लक्ष दिले नाही, असे प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली मानपामधील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे, महापालिकेने त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे माजी नगरसेवक संजय पावशे यांनी सांगितले.

Post a Comment