अचिव्हर्स महाविद्यालयात व्हर्च्यूअल गांधी सप्ताह उत्साहात साजरा
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याणमधील अचिव्हर्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत १५१ व्या गांधी जयंती निमित्त व्हर्च्यूअल गांधी सप्ताह ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या उपक्रमाची सुरुवात वक्ता डॉ हुबनाथ पांडे यांच्या "आजच्या परिस्थितील गांधीजी" या वेबिनारने झाली.
ह्या संपूर्ण सप्ताहात प्रश्नावली स्पर्धा, वृक्षारोपण, काव्यवाचन स्पर्धा, पोस्टर बनवण्याची स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे ह्या उपक्रमाची सांगता वक्ता सागर भालेराव यांच्या "राष्ट्र घडविण्याबाबत गांधीवादी विचार" वेबिनारचे आयोजन करण्यात आले. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण साप्ताहिक उपक्रमासाठी महाविद्यलायचे अध्यक्ष डॉ महेश भिवंडीकर, प्राचार्या सोफिया डिसोझा उपस्थित होते. उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सहाय्यक प्रा. माधुरी मुरबाडे आणि सहाय्यक प्रा. राजेशकुमार यादव व व्हर्च्यूअल करण्यासाठी तांत्रिक सहाय्यक प्रा कविता करंबेळकर यांनी केले तसेच स्वयंसेवकांनी मोलाची कामगिरी दर्शवली.

Post a Comment