वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोरगरिबांना तांदळाचे वाटप भाजप पदाधिकारी मनोज पाटील यांचा मदतीचा हात
डोंबिवली | शंकर जाधव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील भाजपचे डोंबिवली शहर पूर्व मंडल सचिव मनोज वामन पाटील यांनी अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.कोरोनामुळे गरीबांना अद्यापही पोटापाण्याची चिंता आहे.या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मनोज पाटील यांनी अनावश्यक खर्च टाळून नागरिकांना मोफत तांदळाचे वाटप केले.
भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील दत्त नगर येथील वार्ड क्र. ७७ येथील पूर्व मंडल सचिव मनोज पाटील यांचे संपर्क कार्यालयात गरिबांना तांदूळ वाटपाचे आयोजन करण्यात आले.यावेळी सुमारे एक हजार नागरिकांना प्रत्येकी ४ किलोप्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले.यावेळी भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, उमेश साळवी, राजेंद्र बेह्नवाल,राजेंद्र कांबळे,शरद जैन,विजय यादव,हेमंत बारस्कर, राजेश विचारे,संगीत पेंटकर,मंदार अष्टेकर, प्रमोद जगताप,अक्षता चव्हाण, हेमंत ठक्कर आणि प्रभागातील सर्व बूथ पमुख उपस्थित होते.
यावेळी मनोज पाटील म्हणाले कि, गोरगरीब सर्व सामन्यांच्या अडीअडचणींना धावून जाणे , त्यांना मदत करणे हिच शिकवण आमदार रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दिली.त्यांनी आखून दिलेल्या सुत्रानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत तांदूळ वाटप करण्याची कल्पना यातून सूचली.वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून नागरिकांना तांदूळ वाटप केले.यामुळे गोरगरीब जनतेला काही प्रमाणात का होइना दिलासा देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिल्हा अध्यक्ष कांबळे यांनी याप्रसंगी मनोज पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.ते म्हणाले कि, करोनाच्या कालावधीत भाजपने अनेक उपक्रमातून गोरगरीब जनतेला मदत केली.त्याचा प्रत्यय मनोज पाटील यांच्यामुळे आला.

Post a Comment