अभिनय कट्ट्याच्या संगीत कट्ट्याचा अभिनव उपक्रम
ठाणे | प्रतिनिधी : संगीत साधना करूया , चला कोरोनावर मात करूया हे ब्रीदवाक्य घेऊन ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या संगीत कट्ट्याने वुई आर फॉर यु च्या संयुक्त विद्यमाने किरण नाकती यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा संगीत कट्ट्याची सुरुवात केली. संगीत कट्टा क्रमांक ६४ मध्ये ४० हजारांहून अधिक गाणी गाऊन संगीत विश्वात मैलाचा दगड प्रस्थापित करणार्या तसेच, नव्वदचे दशक खर्या अर्थाने आपल्या नावावर करण्यार्या दिवंगत गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना त्यांच्या गाण्यांच्या मध्यमातून आदरांजली देण्यात आली.
अनेक विभागातील रसिकांनी या फेसबुक लाईव्ह संगीत कट्ट्याचा आनंद लुटला. जवळपास १६ भाषांमध्ये बालसुब्रमण्यम यांनी गाणी गायली. कमल हसन आणि सलमान खान या अभिनेत्यांसाठी त्यांचा आवाज प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. दाक्षिणात्य गायकाला हिंदी उच्चार जमत नाहीत हा पूर्वानुभव लक्षात घेऊन ‘एक दुजे के लिए’ चे संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा बालसुब्रमण्यम यांचा नावालाच विरोध होता. परंतु चित्रपटाच्या कथानकात, नायक दक्षिणात्य आहे, त्यांचे गाण्यातले उच्चारही दक्षिणात्य असेल तर काही बिघडत नाही, असे सांगत के. बालचंदर यांनी ती हरकत मोडून काढली.’ तेरे मेरे बीच मे कैसा ये बधंन अंजाना’ या गाण्यासाठी एसपींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला या त्यांच्या आठवणी उलगडताना विनोद पवार यांनी ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातील हे गाणे सादर केले.
दरम्यान , हरिष सुतार यांनी ‘रोझा’ चित्रपटातील ‘रोझा जाने मन ‘रंग में रंगांनेवली ‘ हरिष सुतार आणि गौरी ठाकुर यांनी ‘ हम आपके है कौन ‘चित्रपटातील हम आपके है कौन ‘,राजू पांचाळ आणि निशा पांचाळ ‘ मैने प्यार किया’ चित्रपटातील ‘आते जाते , हरिष सुतार यांनी ‘ लव्ह ‘ चित्रपटातील ‘ मेरी प्रियतमा , विनोद पवार आणि निशा पांचाळ यांनी ‘वंश चित्रपटातील ‘आहे तेरी बाहेर में ‘ विनोद पवार आणि निशा पांचाळ यांनी ‘लव्ह’ चित्रटातील ‘साथिया तूने किया ‘ हरिष सुतार आणि गौरी ठाकुर यांनी ‘ मै प्यार किया ‘ चित्रपटातील पहला पहला प्यार है ‘ , हरिष सुतार आणि गौरी ठाकुर यांनी ‘रोझा‘ चित्रपटातील ‘ये हासी वादीया ‘ हरिष सुतार यांनी ‘सागर’ चित्रपटातील ‘ सच मेरे यार है ‘ ही गाणी सादर केली.
माधुरी कोळी यांनी त्यांच्या आठवणींना निवेदनाच्या माध्यमातून उजाळा दिला तसेच संगीत कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी आपल्या मनोगतात वुई आर फॉर यू या उपक्रमाअंतर्गत कोरोनाकाळात करीत असलेल्या कामासंदर्भात माहिती दिली. कोरोनावर मानसिकरीत्या मात करण्याच्या दृष्टीने संगीत साधना महत्वपूर्ण ठरू शकेल. वुई आर फॉर यु च्या माध्यमातून सेवा देत असताना कोरोना कौन्सिलिंगचा एक भाग संगीत साधना असून अनेक कोरोनाबाधित रुग्णांना संगीत कट्ट्याच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाची लिंक पाठवून संगीत सेवा देण्यात येणार आहे अशी माहिती दिली. पुन्हा एकदा कोरोनारुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा विषय असून आपण सर्वांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी,असे आवाहन केले. या कार्यक्रमाबाद्द्ल अनेक श्रोत्यांनी फेसबुक लाईव्ह बघताना कमेंटमध्ये खूप चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.
अभिनय कट्ट्याच्या संगीत कट्ट्याचा अभिनव उपक्रम
Reviewed by News1 Marathi
on
October 04, 2020
Rating:

Post a Comment