Header AD

'पॅण्‍डेमिक फटिग' म्‍हणजे काय? हा आजार कसा होऊ शकतो यासंदर्भात माहिती

 

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील इन्‍फेक्शिअस डिसीज स्‍पेशालिस्‍ट डॉ. अनिता मॅथ्‍यू यांचा लेख...


कोविड-१९ चे परिणाम वाढतच असताना जवळपास सात महिन्‍यांपासून घरामध्‍येच असलेल्‍या लोकांना आता 'पॅण्‍डेमिक फटिंग'चा त्रास जाणवू लागला आहे. तणाव व नैराश्‍यातून बाहेर पडणा-या मुंबईकरांना आता या थकव्‍याचा अनुभव येऊ लागला आहे. ज्‍यामुळे अस्‍वस्‍थता व औदासिन्‍यतेचा त्रास होत आहे. लॉकडाऊन निर्बंध आता हळूहळू शि‍थील होत असताना हे विशेषत: आढळून येत आहे. आपण 'न्‍यू नॉर्मल'शी जुळवून घेण्‍याचा प्रयत्‍न करत असताना महामारीमुळे निर्माण झालेला थकवा लोकांचे संसर्गावरून दुर्लक्ष करत आहे, जे होता कामा नये. कोविड-१९ संसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 


ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिसीज प्रिपर्डनेस (एसीडीपी)ने नुकत्याच केलेल्या अभ्यासाने कोरोनाव्हायरस किती वेगवेगळ्या पृष्ठभागावर काळ राहतो आणि त्याचा धोका कमी करण्यासाठी कोणते मार्ग शोधता येतील या बाबींवर प्रकाश टाकला. संशोधकांनी सामान्यत: हाताळल्या गेलेल्या वस्तू जसे की नोटा (पैशाचे व्‍यवहार करताना), स्टेनलेस स्टील (स्वयंपाकघरातील वस्‍तू, लिफ्ट आणि सार्वजनिक शौचालयांचा वापर करताना), काच (मोबाइल फोनची स्क्रिन, संगणक आणि एटीएमचा वापर करताना), विनाइल (टेबल टॉप आणि हँडल्सचा वापर करताना) आणि कापूस (घरगुती कापड आणि दररोजच्या कपड्यांचा वापर) यावरील संसर्गाचा प्रसार आणि व्यवहार्यतेचे नमुने समजून घेण्याचा प्रयत्‍न केला. अंधारात करण्‍यात आलेला हा प्रयोग वेगवेगळ्या तापमानात म्हणजेच २० अंश सेल्सिअस, ३० अंश सेल्सिअस आणि ४० अंश सेल्सिअस तापमानात ५० टक्‍के आर्द्रतेच्या वेळी केला गेला. त्यानंतर उपरोक्त पृष्ठभाग एक तास, एक दिवस, तीन दिवस, सात दिवस, २१ दिवस आणि २८ दिवस अशा विविध वेळी जिवंत विषाणूच्या अस्तित्त्वासाठी तपासले गेले. असे आढळले की, २० अंश सेल्सिअसमध्‍ये एसएआरएस-सीओव्ही-२ काच, स्टील आणि नोटा म्‍हणजेच मोबाईल फोन, लिफ्टची बटणे आणि चलन २८ दिवस “अत्यंत व्यवहार्य” होते. ३० अंश सेल्सिअस तापमानात वाचण्याचा दर सात दिवसांवर घसरला आणि ४० अंश सेल्सिअस तापमानामध्‍ये फक्‍त २४ तासांपर्यंत घसरला!  


या उत्तमरित्‍या करण्‍यात आलेल्‍या संशोधनामधून सतत स्‍पर्श केले जाणा-या पृष्‍ठभागांचे निर्जंतुकीकरण करण्‍याची गरज दिसून येते. कोणा संसर्गित व्‍यक्‍तीच्‍या थेट संपर्कात आल्‍याने किंवा जवळच शिंकणा-या किंवा खोकणा-या व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात आल्‍याने हा संसर्ग होण्‍याची शक्‍यता असल्‍यामुळे हे संशोधन अधिकच महत्त्वाचे आहे. 


सामान्‍यत: स्‍पर्श केले जाणारे पृष्‍ठभाग:

(१) दरवाजे व दरवाज्‍यांचे नॉब्‍स 

(२) टेबलवरील पृष्‍ठभाग व खुर्च्‍या 

(३) स्विचबोर्डस् 

(४) मोबाइल फोन्‍स व लॅपटॉप्‍स 

(५) रिमोट कंट्रोल्‍स व कन्‍सोल्‍स 

(६) नळ व फ्लॅशेस् 

(७) लिफ्टची बटने 

(८) हँडरेल्‍स / मजल्‍यांचे रेलिंग्‍स 

(९) शॉपिंग कार्डस् 

(१०) एटीएम बटन्‍स 


पृष्‍ठभाग स्‍वच्‍छ व निर्जंतुक करण्‍याची पद्धत: निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरू करण्‍यापूर्वी ग्‍लोव्‍ह्ज परिधान करा आणि उत्‍पादनाचा वापर करताना पुरेशा प्रमाणात हवा खेळती असण्‍याची काळजी घ्‍या. त्‍यानंतर, 

(१) साबणयुक्‍त पाण्‍याचा वापर करून पृष्‍ठभाग स्‍वच्‍छ करा, त्‍यानंतर निर्जंतुकांचा वापर करा. 

(२) घराला निर्जंतुक करण्‍यासाठी ४ कप पाण्‍यामध्‍ये ५ चमचे किंवा एक-तृतीयांश ब्‍लीच पावडर घ्‍या किंवा १ टक्‍के सोडियम हायपोक्‍लोराइट असलेल्‍या निर्जंतुकाचा वापर करा. तसेच तुम्‍ही किमान ७० टक्‍के अल्‍कोहोलचे प्रमाण असलेले सोल्‍यूशन्‍स देखील वापर करू शकता.

(३) इतरांना संसर्ग होण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी साफसफाई आणि निर्जंतुकीकरण केल्‍यानंतर कापडापासून तयार केलेल्या साफसफाईच्‍या साधनाची (मॉप हेड किंवा साफसफाईचे कापड) योग्‍य रितीने निर्जंतुकीकरण लावा.  

(४) प्रत्‍येक वेळी निर्जंतुकीकरण करताना नवीन ग्‍लोव्‍ह्जचा वापर करा आणि वापरानंतर त्‍यांची योग्‍य रितीने विल्‍हेवाट लावा.

(५) सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे वापरानंतर आणि दुस-या भागामध्‍ये पुनर्वापर करण्‍यापूर्वी सर्व साफसफाईची उपकरणे निर्जं‍तुक करा; त्‍यांना गरम पाण्‍यामध्‍ये बुडवून ठेवा. 

(६) निर्जतुकीकरण प्रकियेदरम्‍यान वृद्ध व्‍यक्‍ती, लहान मुले, पाळीव प्राणी आणि श्‍वसनविषयक आजार असलेल्‍या इतर लोकांना दूर ठेवा.


'पॅण्‍डेमिक फॅटिग' आजार झाला असेल तरी सुरक्षितता घेण्‍याची सवय सोडू नये हे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. चांगल्‍या पद्धतींचा अवलंब करा, ज्‍यामुळे मुले व वृद्ध व्‍यक्‍तींच्‍या आरोग्‍याचे संरक्षण होईल. स्‍टील, काच व नोटा अशा सामान्‍य पृष्‍ठभागांवर विषाणू २८ दिवसांपर्यंत राहू शकतो ही बाब पाहता आपण अधिक काळजी घेतली पाहिजे. भितीने घाबरून जाऊ नका आणि स्थितीपासून माघार देखील घेऊ नका. त्‍याऐवजी योग्‍य माहिती जाणून घ्‍या आणि घरातील व घराबाहेरील विषाणूचे निर्मूलन करण्याचा प्रयत्‍न करा. कुटुंबातील सदस्‍यांना तुमचे सहयोगी बनवा आणि हात स्‍वच्‍छ धुणे, सोशल डिस्‍टन्सिंग व खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडासमोर रूमाल धरणे अशा सवयींचे पालन करा, ज्‍यामुळे तुमचे कुटुंब सुरक्षित राहिल. 


'पॅण्‍डेमिक फटिग' म्‍हणजे काय? हा आजार कसा होऊ शकतो यासंदर्भात माहिती 'पॅण्‍डेमिक फटिग' म्‍हणजे काय? हा आजार कसा होऊ शकतो यासंदर्भात माहिती Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads