भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी परेश गुजरे
कल्याण | कुणाल म्हात्रे : टिटवाळा येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते परेश गुजरे यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परेश गुजरे यांनी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर असताना केलेल्या अनेक उल्लेखनीय उपक्रमांची आणि सातत्याने सक्रीय राहून नेतृत्व बळकटी करण्यासाठी प्रयत्नशील राहत ग्राउंड लेवलला जाऊन केलेल्या कार्याचे दखल घेऊन त्यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, विक्रांत पाटील यांच्या हस्ते त्यांना या पदाची जबाबदारी सोपवत नियुक्तीपत्र देण्यात आले.
समाजिक बांधिलकी जोपासत स्मार्ट आधार कार्ड शिबिर, आरोग्य शिबिर तसेच कला व क्रीडा स्पर्धा, भारतीय सैनिक / माजी सैनिकांचा सत्कार, शरीर सौष्टव स्पर्धा, टिटवाळा परिसरातील शाळांमधील यशस्वी आणि गुणी विद्यार्थ्यांना बालरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा असे अनेक यशस्वी कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले. एक सामान्य कार्यकर्ता ते भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो या नात्याने ते नेहमीच समाजातील सर्व गरजु लोकांना मदत करत असतात. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वच क्षेत्रांतून त्यांन शुभेच्छा देण्यात येत आहेत. “ हि नवीन जवाबदारी माझ्यासाठी नव्या कार्याची प्रेरणा ठरली आहे. माझ्यातील मूळ कार्यकर्त्याच्या भूमिकेतून संघटनात्मक पातळीवर पक्षवाढीसाठी शंभर टक्के प्रयत्न यापुढेही निश्चितपणे करत राहीन” असे मत यावेळी परेश गुजरे यांनी व्यक्त केले.

Post a Comment