Header AD

सामान्य दुर्गांचा महाराष्ट्र दिनमान कला मंदिर कडून अनोखा सन्मान


■ दैनिक महाराष्ट्र दिनमानने सामान्य वर्गातल्या कर्तबगार महिलांचा 'दिनमान दुर्गा' असा गौरव करून त्यांची असामान्य कर्तबगारी जनमानसात पोहचविण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र दिनमान आणि कलामंदिरकडून सन्मानित करण्यात आलेल्या या सर्व महिला कोरोना संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून जनसेवा करीत आहेत. म्हणूनच हा ठाणे जिल्ह्यातील सामान्य नारीचा हा पहिला सन्मान ठरला आहे...ठाणे | प्रतिनिधी  :
  
जिल्ह्यातला पहिला सन्मान ठाणे जिल्ह्यात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान झालेला आहे. दैनिक महाराष्ट्र दिनमानने मात्र सामान्य वर्गातल्या कर्तबगार महिलांचा 'दिनमान दुर्गा' असा गौरव करून त्यांची असामान्य कर्तबगारी जनमानसात पोहचविण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र दिनमान आणि कलामंदिरकडून सन्मानित करण्यात आलेल्या या सर्व महिला कोरोना संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून जनसेवा कारीत आहेत. म्हणूनच हा ठाणे जिल्ह्यातील सामान्य नारीचा हा पहिला सन्मान ठरला आहे.

कोरोनाच्या संसर्गात ठाणे जिल्ह्यात अनेकांनी कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. दैनिक महाराष्ट्र दिनमान आणि कलामंदिरने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाणे महानगर पालिका परिक्षेत्रात अशी जनसेवा करणाऱ्या महिलांचा शोध घेऊन त्यांचे असामान्य कार्य जनमानसात पोहचविण्याचे काम केले आहे. स्वतः अगदी सामान्य असूनही त्यांनी कोरोनासारख्या भयंकर संसर्गाला  न घबरता कडक लॉकडाऊनमध्ये गरिबांना मदत केली आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळात त्यांची ही सेवा कौतुकास्पद तर आहेच पण तेवढीच धाडसी देखील आहे. म्हणूनच या धाडसी महिला ठाण्याचे भूषण ठराव्यात अशा आहेत. दिनमानने एकूण आठ महिलांची निवड करून त्यांना बुधवारी 'दिनमान दुर्गा' सन्मान देऊन गौरविले आहे. हा गौरव सन्मान ठाण्यातील नौपाडा परिसरात असलेल्या कलामंदिर येथे पार पडला. दैनिक महाराष्ट्र दिनमानच्या संचालिका प्राध्यापिका अर्चना माळवी, कलामंदिरचे संचालक आल्पेश छाडवा, ठाणे महानगर पालिका नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवर सत्कारमूर्ती महिलांना अर्चना माळवी, आल्पेश छाडवा, प्रणाली घोंगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी दैनिक महाराष्ट्र दिनमानच्या संचालिका अर्चना माळवी यांनी सर्व महिलांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले. कोरोनाच्या काळात अनेकांनी जनसेवा, रुग्णसेवा करण्याचे काम केले आहे. पण स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर येऊन गरजूंची सेवा करणाऱ्यांमध्ये या धाडसी महिलांचा समावेश आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भयानक परिस्थिती होती. सगळेच घाबरलेले होते. अशावेळी या महिलांनी स्वतःच्या कुटुंबाची आणि जीवाची पर्वा न करता काम केले आहे. म्हणूनच त्यांच्या कामाचे कौतुक आहे, त्यांच्या देशसेवेचा अभिमान वाटतो आहे. असे सांगून दैनिक महाराष्ट्र दिनमानने त्यांचा शोध घेऊन खऱ्या वर्तमान पत्राचे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे सर्व दिनमान टीमला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही दिनमान ही भूमिका कधीच सोडणार नाही अशी हमी देखील त्यांनी यावेळी दिली. 

तर ठाणे महानगर पालिका सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी देखील दिनमानच्या कार्याचे कौतुक करून कोरोनाच्या काळात जनसेवा करणाऱ्या सर्व महिलांचे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने अभिनंदन केले. तर ठाणे महानगर पालिका कोरोनाला नियंत्रित ठेवण्यात यशस्वी होत आहे. यात एकट्या ठाणे महानगर पालिकेचे काम नाही. तर आपणासारख्या महिला, सुरक्षा विभाग, सफाई विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी, समाजसेवक अशा सगळ्यांनीच मोलाची भूमिका बजावली आहे. दैनिक महाराष्ट्र दिनमानने देखील शासनाकडून वेळोवेळी येणारे निर्देश, जनजागृती लोकांपर्यंत पोहचवून या कामाला हातभार लावला आहे. या सगळ्यांच्या एकजुटीमुळेच ठाण्यातील कोरोना नियंत्रणात आणला असे म्हणता येईल. अशा शब्दात मार्गदर्शन केले.
 
आपण समाजासाठी काय केले पाहिजे याचे उत्तम उदाहरण आज पाहायला मिळाले. सामान्य क्षेत्रातल्या या महिलांनी ही कामगिरी करून दाखविली असून दैनिक महाराष्ट्र दिनमानमुळे त्यांचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने माळवी मॅडम यांचे आभारी आहे. कलामंदिरचे संचालक आल्पेश छाडवा यांनी असे मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे, रिक्षा चालक मीरा धायजे, कोविड रुग्णालयातील मावशी सुनीता प्रसाद, महिला पोलीस नाईक सुनीता औसेकर, शिक्षिका रझिया बेग, सफाई कर्मचारी शोभा वैराळ, महिला सुरक्षा रक्षक माधुरी सूर्यराव, समाजसेविका अर्चना शहाणे यांना 'दिनमान दुर्गा' सन्मान देऊन गौरविण्यात आले. 


सामान्य दुर्गांचा महाराष्ट्र दिनमान कला मंदिर कडून अनोखा सन्मान सामान्य दुर्गांचा महाराष्ट्र दिनमान कला मंदिर कडून अनोखा सन्मान Reviewed by News1 Marathi on October 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads