Header AD

टिटवाळ्यातील कोविड सेंटरची प्रतीक्षा लवकरच संपणार कोरोना रुग्णांना मिळणार दिलासा
कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून टिटवाळा आणि आसपासच्या परिसारत देखील कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यासाठी टिटवाळा येथील कोविड सेंटरचे काम सुरु करण्यात आले असून हे कोविड सेंटर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याने येथील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.


कोरोना पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने खंबीर पणे दक्ष भुमिका घेत मनपाक्षेत्रात आँक्सिजन बेडआयसीयु बेड संख्या वाढवित कोवीड सेन्टर उभारत आहे. मनपा क्षेत्रातील ग्रामीण "अ" प्रभाग क्षेत्रातील १० प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी टिटवाळा पुर्वीतील मनपा आरक्षित तळमजला अधिक दोन माळेसह स्टेरेज् अशा भव्य रूक्मिणी प्लाझा इमारतीत ७० आँक्सिजन बेड९ आयसीयु बेड मेडिकल सुविधा सह मनपाच्या माध्यमातून साकरत आहे. स्थापत्य व विघुत व्यवस्था कामासाठी सुमारे १ कोटी १५ लाख रू खर्च अपेक्षित आहे.

             

       निसर्ग रम्य परिसरात रुक्मिणी प्लाजा टिटवाळा महागणपती परिसरात  कोवीड सेन्टरतसेच मोहने परिसरात एनआरसी स्कुल मध्ये ३१२ बेडचे सुमारे ४५ लाख रु खर्च नियोजित कोवीड काँरटाईन सेन्टर उभारण्यात येत आहे.  यामुळे ग्रामीण "अ" प्रभागातील टिटवाळाबल्याणीमोहेलीउभर्णीगाळेगावजेतवननगर, फुलेनगरमोहने वडवली अटाळीआंबिवलीशहाड आदि परिसरातील नागरिकांच्या सोयीच्या दुष्टीकोनातुन या कोवीड सेन्टर मुळे मोठा दिलासा मिळणार आहे.          


याबाबत शहर अभियंता सपना कोळी यांच्याशी संपर्क साधला असता. रूक्मिणी प्लाझा कोवीड सेन्टरएन् आर् सी स्कुल काँरटाईन् सेन्टरची  कामे येत्या १५ दिवसात मार्गी लागतील असे सांगितले. तर रुक्मिणी प्लाझा कोविड सेंटर हे कायमस्वरूपी रुग्णालय सुरु ठेवण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. 

टिटवाळ्यातील कोविड सेंटरची प्रतीक्षा लवकरच संपणार कोरोना रुग्णांना मिळणार दिलासा टिटवाळ्यातील कोविड सेंटरची प्रतीक्षा लवकरच संपणार कोरोना रुग्णांना मिळणार दिलासा  Reviewed by News1 Marathi on October 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads