वडवली रेल्वे फाटक वाहतुक कोंडी प्रश्नी आमदार विश्वनाथ भोईर यांना साकडे
कल्याण | कुणाल म्हात्रे : वडवली रेल्वे फाटकाच्या दुर्तफा दररोज वाहतूक कोंडी होतअसल्याने या मार्गावरून वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वाहतुक कोंडीमुळेखोळंबा होत असल्याने प्रचंड मनस्ताप सहनकरावा लागत आहे. याबाबत उपाययोजना करीत वाहतुक कोंडीतून वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनादिलासा मिळणेबाबत कल्याण ग्रामीण ग्राहक संरक्षक कक्ष तालुका प्रमुख कल्याण विजयदेशेकर यांनी कल्याण वाहतूक विभाग, खडकपाडा पोलिस स्टेशन आणि कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांना निवेदन देत साकडे घातले आहे.
कोरोनापार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, व्यापारी तसेच कामधंद्यानिमित्ताने चारचाकी, दुचाकी, रिक्क्षा, बसेस या वाहानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्यरेल्वेच्या अंबिवली व शहाड रेल्वे स्थानकादरम्यान असलेले वडवली रेल्वे क्राँसिंगगेट नं४७ फाटकामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे रेल्वे फाटकांच्या दुर्तफावाहनांच्या नेहमीच रांगा लागत असल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्तापसहन करावे लागणे हे नित्याचे झाले आहे. याबाबतकायम वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. वाहनचालकांनी शिस्तीचे पालन करावे, वडवली उड्डाण पुलाच्याकामातील दिरंगाई आदी विषयांचे निवदेन कल्याण ग्रामीण ग्राहक संरक्षक कक्ष तालुकाप्रमुख कल्याण विजय देशेकर यांनी कल्याणवाहतूक विभाग, खडकपाडा पोलिस स्टेशन आणि कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर यांना दिले असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचे साकडे घातले आहे.
यावेळी उप-शहरप्रमुखविजय काटकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख सुनिल वायले, शिवसेना ग्राहकसंरक्षण कक्ष कल्याण - शहरप्रमुख.विद्याधर भोईर, शिवसेना कार्यकर्ते रोहन कोट,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अंबिवली कक्षप्रमुख रमण तरे, कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप घाणेकर उपस्थितहोते.

Post a Comment