Header AD

कल्याण डोंबिवली शहराचे वाटोळे होण्यास भाजपा देखील तितकीच जबाबदार मनसे आमदार राजू पाटील
कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :  भाजपने शिवसेनेबरोबर सहा महिन्यापूर्वी घटस्फोट घेतली असली तरी भाजपा आपल्या दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. मागील २०  ते २५ वर्षांपासून त्यांच्याबरोबर सत्तेत आहे. त्यामुळे शहराचा वाटोळे होण्यास भाजपा देखील तितकीच जबाबदार आहे. आता भाजपाने विरोधी भूमिका घेतली आहे ते स्वागततार्ह आहे मात्र असाच आवाज त्यांनी आधी उठवला असता तर शहराचा चांगला विकास होऊ शकला असता अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या पालिकेतील आंदोलना बाबत केली.


 पालिकेने कर वसुलीसाठी अभय योजना लागू केल्यानंतर कळून ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी २७  गावातील मालमताना चुकीच्या दराने  केलेल्या कर आकारणीकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७  गावांपैकी १८ गावे वगळली गेली असली तरी आद्यपी पालिकेत असलेल्या ९  गावांना महापालिका प्रशासनाने पूर्वीच्या रेटेबल दरानुसार कर आकारणी करण्याऐवजी २०१५ च्या बाजार भावानुसार कर आकारणी केली आहे. यामुळे नागरिकांना ३ पट ५ पट आणि काही जणांना ८ पट कर वाढ लादली गेली असून ही आकारणी चुकीची असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत या विषयावर महासभेत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.


 तसेच हा प्रश्न सोडविल्यास पालिकेचा रखडलेला मालमत्ता कर वसूल होऊ शकेलं असे ते म्हणाले .पुढे बोलताना पाटील यांनी रेल्वे बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रवासात होणाऱ्या हाल विशद करताना त्यांनी  कल्याण शीळ रोडच्या कामाचे भिजत घोंगडे पडले असून पत्रिपुलाची जगातील आठवे आसचर्य तयार करण्यासाठी बांधणी केली जात आहे काअस सवाल करताना नागरिकांच्या सोयीसाठी छोटे छोटे मार्ग निघू शकतात मात्र नागरीकांच्या त्रासाची याना काहीही पडलेली नसल्याचा आरोप केला.


डोंबिवली तुन जाणाऱ्या ५ जणांच्या क्षमतेच्या होडीतून १०  ते १२  जण जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. मागच्या सरकार मध्ये असलेल्या डोंबिवलीच्या आमदाराकडे बंदरे विकास खाते होत त्यावेळी काही उपाययोजना केल्या असत्या तर त्याचा आता नागरिकांना फायदा झाला असता मात्र सर्वच उदासीन असल्यामुळे डोंबिवलीकरांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागणार असल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

कल्याण डोंबिवली शहराचे वाटोळे होण्यास भाजपा देखील तितकीच जबाबदार मनसे आमदार राजू पाटील कल्याण डोंबिवली शहराचे वाटोळे होण्यास भाजपा देखील तितकीच जबाबदार मनसे आमदार राजू पाटील Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads