Header AD

कल्याण डोंबिवलीत २९३ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

 

,८८८ एकूण रुग्ण तर ९५६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज...



कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २९३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या २९३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४७,८८८ झाली आहे. यामध्ये २७५० रुग्ण उपचार घेत असून ४,१८२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २९३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३६कल्याण प – ८८डोंबिवली पूर्व १००डोंबिवली प- ३९मांडा टिटवाळा -२५, तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 



       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६२ रुग्ण टाटा आमंत्रामधून१ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोवि रुग्णालयातून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २९३ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत २९३ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads