Header AD

नर सेवा - नारायण पूजा या भावनेने १०१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदानकल्याण | कुणाल म्हात्रे  : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन नर सेवा – नारायण पूजा’ हा भाव बाळगून संत निरंकारी सत्संग भवनगोल मैदान उल्हासनगर येथे संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १०१ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले ज्यामध्ये ७१ पुरुष आणि ३० महिलांचा समावेश होता.


      संत निरंकारी मिशन मानवतेच्या सेवेमध्ये सदोदित आपले योगदान देत आले आहे आणि कोविड-१९ च्या महामारी दरम्यानदेखिल आतापर्यंत रेशन व लंगर वितरणकोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कपीपीई कीटस यांसारख्या सुरक्षा सामग्रीचे वितरण करत आले आहे. सध्याच्या अनलॉक स्थितिचा लाभ घेऊन तसेच रक्त टंचाईचा विचार करुन मागिल सुमारे दीड महिन्यापासून मिशनच्या वतीने रक्तदान अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. याच मोहिमे अंतर्गत उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये निरंकारी भक्तांच्या चेहऱ्यावर निष्काम मानवसेवेचे भाव झळकत होते.  
      या रक्तदान शिबिरामध्ये उल्हासनगर सैंट्रल हॉस्पिटलच्या रक्तपेढीने ४८ युनिट रक्त संकलित केले तर रेड क्रॉसच्या रक्तपेढीने ५३ युनिट रक्त संकलित केले. संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्याहस्ते या रक्तदान शिविराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक किशनचंद नेनवानी तसेच सेवादलचे अधिकारी उपस्थित होते.


      शिबिरामध्ये प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या कोविड-१९ संदर्भातील निर्देशांचेउदा. मास्क परिधान करणेसॅनिटाईझरचा वापर करणेसामाजिक अंतर ठेवणे इ.से यथायोग्य पालन करण्यात आले.  संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात आले.


      अशाच प्रकारचे रक्तदान शिबिर संत निरंकारी सत्संग भवनचेंबूरमुंबई येथेही त्याच दिवशी आयोजित करण्यात आले ज्यामध्ये २२१ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने व सेवाभावनेने रक्तदान केले.

नर सेवा - नारायण पूजा या भावनेने १०१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान नर सेवा - नारायण पूजा या भावनेने १०१ निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान Reviewed by News1 Marathi on October 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads