कॉंग्रेस सेवा दल डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष समशेर खान यांच्यावतीने गरिबांना मास्कचे वाटप
डोंबिवली | शंकर जाधव : कॉंग्रेस सेवा दल डोंबिवली पूर्व शहर अध्यक्ष समशेर खान यांच्यावतीने डोंबिवली पूर्वेकडील एकता नगर येथील गरिबांना मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत गरिबांना अन्न मिळत नव्हते, अश्यावेळी मास्क घेणे अवघड होते. गरिबांची हि अडचण लक्षात घेऊन खान यांनी गरीब वस्तीत जाऊन मास्कचे वाटप केले.यावेळी सदस्य आलोक मिश्रा,कल्याण जिल्हाध्यक्ष लालचंद तिवारी,जीतवार सिंह, कमलाकर जयस्वाल,ईरफान मौलाना- सय्यद, साहीद खान आदी उपस्थित होते.यावेळी खान यांनी कोरोनाच्या काळात आपली इतरांच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल याबाबत उपस्थितींंना मार्गदर्शन दिले.
सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टसिंग, तोंडावर मास्क लावणे आणि वेळोवेळी साबणाने हात धुणे अथवा सॅनेटराईज करणे, आवश्यक असल्यास घराबाहेर पाडावे,समोरच्याशी बोलताना दोन ते तीन फुटचे अंतर ठेवणे महत्वाचे असे पटवून दिले. तसेच कॉग्रेस गरिबांच्या पाठीशी उभा असून यापुढेही उभे राहणार.माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर कॉंग्रेसने जी जबाबदारी दिली आहे त्याबाबत वरिष्ठ नेतेमंडळींंचे आभार मानतो असे खान यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment