Header AD

रिक्षांद्वारे माझे कुटुंब माझी जवाबदारी जनजागृतीला सुरवात विनामास्क रिक्षात प्रवेश नाही पालिका आयुक्त
कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :   कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकाक्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब माझी जवाबदारी अभियान सुरु असून याची जनजागृती करण्यासाठी आता महानगरपालिकेने रिक्षांचा आधार घेतला असून रिक्षांवर स्टीकर आणि पोस्टर लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. आज पालिका मुख्यालयात काही रिक्षांवर हे स्टीकर आणि पोस्टर लावण्यात आले. तर रिक्षातून प्रवास करताना विनामास्क व्यक्तीला रिक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
प्रत्येक रिक्षावर माझे कुटुंब माझी जवाबदारी या उपक्रमाच्या सूचना रिक्षाच्या मागे आणि रिक्षात देखील स्टीकरच्या माध्यमातून लावण्यात आल्या असून मास्क लावल्याशिवाय प्रवाशांना रिक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय रिक्षा संघटनेने घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

     तर साडेपाच हजार स्टीकर बनविण्यात आले असून ते साडेपाच हजार रिक्षांमध्ये लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रिक्षा केवळ कल्याण डोंबिवली शहरात फिरणार नसून बदलापूर, ठाणे नवीमुंबई अशा सर्व ठिकाणी जात असतात. त्यामुळे या शहरात देखील या उपक्रमाची जनजागृती होणार असल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तथा सभागृहनेते प्रकाश पेणकर यांनी दिली.

रिक्षांद्वारे माझे कुटुंब माझी जवाबदारी जनजागृतीला सुरवात विनामास्क रिक्षात प्रवेश नाही पालिका आयुक्त रिक्षांद्वारे माझे कुटुंब माझी जवाबदारी जनजागृतीला सुरवात  विनामास्क रिक्षात प्रवेश नाही पालिका आयुक्त Reviewed by News1 Marathi on October 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads