महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ठाण्यात विविध ठिकाणी स्वछता अभियान व औषध फवारणी
ठाणे | प्रतिनिधी : ठाण्यात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी स्वछता अभियान व औषध फवारणी करण्यात आली. यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक संदीप लेले, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका सौ. मढवी, मृणाल पेंडसे, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजपा ठाणे सरचिटणीस कैलास म्हात्रे, डॉ. राजेश मढवी, स्वप्नाली साळवी, राजेश गाडे, निलेश कोळी, विशाल वाघ व पदाधिकारी उपस्थित होते.
ठाण्यातील खोपट येथील एस टी स्टँड येथे आ. केळकर व ठाणे शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत औषध फवारणी करण्यात आली तर तलावपाळी येथील महात्मा गांधी उद्यानात गांधींच्या पुतळ्याला हार घालून फुले वाहण्यात आली. खारटन रोड येथील रमाबाई चौकात, मानपाडा व बाळकूम येथे स्वछता मोहीम अभियान करण्यात आले.
यावेळी आ. केळकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त नागरिकांना शुभेच्छा देऊन तलावपाळी येथील महात्मा गांधी उद्यानात लाल बहादूर शास्त्री यांचा पुतळा उभारण्याची मागणी करून गेली तीन वर्षे मी या करिता महापालिका प्रशासना कडे पाठपुरावा करत असून अद्यापही त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला नसल्याबाबत खंत व्यक्त केली. पुतळा उभारण्यास माझा आमदार निधीही मी देण्यास तयार असल्याचे महापालिकेला कळविले असून या बाबतही महापालिका उदासीन असल्याचे दिसून येत आहे असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment