Header AD

झानाडूची एकता वर्ल्डसह भागीदारी

 


मुंबई, २९ ऑक्टोबर २०२० : रिअॅलिटी क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्थात्मक विकासातील तज्ञ झानाडू ग्रुपने रिअल इस्टेट पॉवरहाऊस एकता वर्ल्डशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीद्वारे झानाडूने बांद्रा-खार-सांताक्रूझसारख्या अल्ट्रा-लक्झरी सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बहुतांश रिअल इस्टेट व्यवसाय मंदीत असून नवे प्रकल्प पुढे ढकलत असताना, झानाडू रिअॅलिटीने आपले व्यवसाय यशस्वीरित्या वाढवण्यात यश मिळवले आहे. एकता वर्ल्डच्या लक्झरी पोर्टफोलिओमधील विक्रीला गती देण्याचे काम झनाडू करेल. एकता वर्ल्डचे लक्झरी कलेक्शन म्हणजे प्राइम मायक्रो मार्केटमधील प्रकल्पांचा समूह आहे. पाली हिलमधील ‘द वन’, खार पश्चिममधील ‘द वर्व्ह’ आणि सांताक्रूझ पश्चिममधील ‘ट्रिनिटी’ या सर्वांचे एकत्रित मूल्य ४०० कोटी रुपये आहे. 


झानाडू ग्रुपचे सीईओ श्री विकास चतुर्वेदी म्हणाले, “लक्झरी आणि सुपर प्रीमियम श्रेणीत मार्केटिंग आणि विक्री क्षेत्रात आम्ही आमची क्षमता सिद्ध केली आहे. यात आम्ही क्लाएंट आणि प्रोजेक्ट ब्रँड, हातात प्रकल्प, आरओआय ची शक्यता, प्रत्येक पैलूत ग्राहकाचा अनुभव उन्नत करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी उच्च प्रतीचे प्रयत्न केले आहेत. प्राइम मुंबई वेस्टच्या लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये क्रांती घडवण्यात झानाडू आणि एकता समूहाची भागीदारी यशस्वी होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”


झानाडूची एकता वर्ल्डसह भागीदारी झानाडूची एकता वर्ल्डसह भागीदारी Reviewed by News1 Marathi on October 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads