Header AD

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संकलित केले १२८ युनिट रक्त

 कल्याण  |  कुणाल  म्हात्रे   :  कोरोना संकटकाळात सामाजिक बाधंलकी चा वसा जोपसणार्या मोहने येथील मैत्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एन् आर् सी गेट येथे रविवारी सोशल डिस्टन नियमाचे पालन करीत रक्तदान शिबीर संपन्न झाले. यामध्ये १२८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.एन् आर् सी शाळेतील १९९६च्या दहावी बँच् च्या माजी विघार्थी एकत्र येत मैत्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेली सहा वर्षी पासुन सामाजिक बांधलीकीच्या जाणीवेतून रक्तदान शिबीराचे आयोजन करतात. यंदा कोरोना पार्श्वभूमीवर थालेसमिया बाधित  बालकांना   रक्ताचा तुटवडा भासत आहे. 
यासाठी मैत्री प्रतिष्ठान पुढकार घेत सर्वदय ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. रक्तदात्यांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी प्लास्टिक डब्बे मैत्री  प्रतिष्ठानने कै. वत्सलबाई  आंबादास पाटील यांच्या स्मुतीप्रत्यार्थ देत कचरामुक्त मोहिमेला हातभार लावण्याचा संदेश यानिमित्ताने दिला.

 या प्रसंगी १२८रक्तदात्यांनी रक्तदान केले.  रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजन साठी मैत्री प्रतिष्ठान चे सचिन घाटगे, पकंज पाटील, डॉ. हरिद्वार पाटील, बिपिन साबळे, सचिन नलावडे, हनुमान पाटील, राकेश पाटील सहकरी यांनी मेहनत घेतली.

माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संकलित केले १२८ युनिट रक्त माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संकलित केले १२८ युनिट रक्त Reviewed by News1 Marathi on October 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads