Header AD

ठाण्यात वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा वृत्तपत्र विक्रेता भारतरथ या कंपनीची उत्पादने घराघरात पोहोचवणार


    छाया: प्रफुुुल गांगुर्डे 

ठाणे | प्रतिनिधी  : वृत्तपत्र विक्री व्यवसाय कोरोनामुळे बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वृत्तपत्र विक्रेता वर्षात 360 दिवस बिनचूकपणे काम करत असतो. ऊन पाऊस वारा कोणत्याही तमा न बाळगता तो काम करतो, पावसात विक्रेता स्वतः भिजतो पण ग्राहकांचा पेपर तो कधी भिजू देत नाही त्यांच्या याच गुणाचा विचार करून "भारतरथ" ह्या कंपनीची स्थापना खास वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी झालेली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसा निमित्त गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन व  भारतरथचा उद्घाटन सोहळा पहाटे ठीक 5.30 वाजता बी केबिन,नौपाडा येथे वृत्तपत्र विक्रेत्यां सोबत केक कापून साजरा करण्यात आला.

या कंपनीतर्फे शेतकरी ते थेट ग्राहक, उत्पादक ते थेट ग्राहक, केमिकल फ्री व प्रिझर्वेटिव्ह फ्री उच्च दर्जाची उत्पादने ग्राहकांना वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत थेट घरपोच मिळणार आहे. शिवाय वेगवेगळ्या राज्यातील प्रसिद्ध मिठाई मथुरेचा पेढा, आग्र्याचा पेठा,जयपुरचा घेवर  या भारतरथ अँप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी केल्यावर दुसऱ्या दिवशी ती उत्पादने आपल्याला घरपोच वृत्तपत्र विक्रेता देईल. या कार्यक्रमासाठी आमदार संजय केळकर ,ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन चे अध्यक्ष श्री दत्ता घाडगे,अरविंद दातार,भारतरथचे संचालक संदीप मुळे, ऑपरेशन हेड आलोक शुक्ला उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त ठाण्यातील रोटरी क्लब तसेच हिरानंदानी इस्टेट मधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे,मुकेश ठोंबरे यांनी स्वतः जाऊन वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क व मिठाई वाटप केली.

खास वृत्तपत्र विक्रेत्यांना मार्केटिंग कसे करावे  व प्रत्यक्षात त्यांच्या बरोबर  घरोघरी जाऊन ग्राहकांना आपले प्रॉडक्ट कसे विकावे यासाठी मदत करण्यासाठी टीम एक्स्कलेंट सदस्य एक सामाजिक जबाबदारी म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या साठी  मोफत काम करणार आहेत. नौपाड्यातील नगरसेविका सौ प्रतिभा  मढवी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना डिजिटल थर्मामीटर व अपघात विमा उतरविला अशी माहिती वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक व सामाजिक स्तर उंचवण्यासाठी सतत काम करणारे ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन चे अध्यक्ष श्री दत्ता घाडगे यांनी सांगितले.
ठाण्यात वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा वृत्तपत्र विक्रेता भारतरथ या कंपनीची उत्पादने घराघरात पोहोचवणार ठाण्यात वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा वृत्तपत्र विक्रेता भारतरथ या कंपनीची उत्पादने घराघरात पोहोचवणार Reviewed by News1 Marathi on October 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads