अतिवृष्टी ग्रस्तांना मदतीसाठी केंद्र सरकार कडून महाराष्ट्राला भरीव मदत द्यावी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई | प्रतिनिधी : महराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने महापूर येऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतात पाणी आणि चिखल साचल्याने पुढील रब्बी पिकांचा हंगाम ही वाया जाणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीने शेतकरी शेतमजुर पूर्ण उध्वस्त झाले आहे. त्यांना मदत देण्यासाठी; पुन्हा शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकार ने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी तात्काळ मदत देण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन; कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिले आहे. याबाबत ना रामदास आठवले लवकरच केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेणार आहेत.
महराष्ट्र सरकार ने अतिवृष्टीग्रस्तांना अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे.अद्याप नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. अतिवृष्टीने पूल कोसळले आहेत त्यासोबत शेतकरी शेतमजूर सुद्धा मनातून कोसळले आहेत. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक होते मात्र राज्य शासनाने अद्याप मदत दिलेली नाही. एन डी आर एफ च्या माध्यमातून एकरी 37 हजाराची मदत मिळत आहे. ती केंद्र सरकारचीच मदत आहे.अतुवृष्टीत जीवित हानी झालेल्या कुटुंबाला सांत्वनपर केवळ 4 लाख रुपये राज्य शासन देत असून ती रक्कम अत्यल्प आहे त्यात वाढ करून किमान 10 लाख रुपये सांत्वनपर निधी अतुवृष्टीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना द्यावा त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र पाठवीत आसल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे. तसेच पंढरपूर मध्ये चंद्रभागा नदी किनारी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला . त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी अशी आपली मागणी असून तसे पत्र मुख्यमंत्री आणि पंढरपूर पालिकेत देणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
ना. रामदास आठवले यांनी नुकताच अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. बारामती; फलटण; पंढरपूर आणि आटपाडी दिघांची येथे पूरग्रस्त अतिवृष्टी बधितांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आटपाडी जिल्हा सांगली मधील दिघंची गावात शेतकरी संवाद ही केला. अतिवृष्टीग्रस्तांचा पाहणी दौरा करून आल्यानंतर ना.रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री ; केंद्रीय कृषी मंत्री यांना पत्र लिहून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देऊन अतिवृष्टीग्रस्तांना नवजीवन देण्याची मागणी केली.
अतिवृष्टी ग्रस्तांना मदतीसाठी केंद्र सरकार कडून महाराष्ट्राला भरीव मदत द्यावी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे पंतप्रधानांना पत्र
Reviewed by News1 Marathi
on
October 24, 2020
Rating:

Post a Comment