Header AD

दिवाळी मध्ये फटाके विक्री व वाज विणाची बंदीची काँग्रेसची मागणी



ठाणे   | प्रतिनिधी  :  एकीकडे कोरोना प्रादुर्भावला आळा बसावा म्हणून विविध उपाय योजित असताना यावर्षी येणा-या दिवाळी मध्ये फटाके विक्री व वाजविण्यास बंदी आणावी अशी मागणी ठाणे शहर (जि.)काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.येणा-या दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविले जातील व त्यामूळे मोठ्या प्रमाणावर वातावरणात प्रदूषण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रदूषणचा परिणाम कोरोना रूग्ण वाढीस कारण ठरू शकते व कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी त्रासदायक ठरेल म्हणून या दिवाळीच्या कालावधीत फटाका विक्री व वाजविण्यावर पूर्णता बंदी आणावी जेणेकरून काही प्रमाणात कमी होत असलेल्या रूग्णाची सख्या आपण नियंत्रण करू शकतो अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.

दिवाळी मध्ये फटाके विक्री व वाज विणाची बंदीची काँग्रेसची मागणी दिवाळी मध्ये फटाके विक्री व वाज विणाची बंदीची काँग्रेसची मागणी Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads