युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे रक्तदान शिबिर
कल्याण : सध्या राज्यांमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यासाठी रक्तदान शिबीर जि. प. शाळा गोवेली येथे संपन्न झाले. ह्या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्याने रक्तदान केले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लोकांनी रक्तदान करणे खुप कमी केले आहे. पण कॅन्सर, ऑपरेशन, थॅलेसेमीया, गरोदर स्त्रियांसाठी रक्ताची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदानात आरोग्य विभागाने ठेवलेले नियम पाळुन रक्तदान केले व सर्व रक्तदात्याना कार्ड, प्रमाणपत्र व एक झाड देऊन गौरविण्यात आले.
ह्या कार्यक्रमात जि. परिषद सदस्य जयश्री सासे, जे. जे. हॉस्पिटलच्या दिपाली सुर्वे, मानवताचे निलेश बच्छाव, जि. प. शाळा मुख्याध्यापक तथा प्र. केंद्र प्रमुख हरिश्चंद्र मिरकुटे, सर्व शिक्षक वर्ग, गोवेली ग्रामसेवक शेलवले, युवा संस्कारचे कमलाकर राऊत, विकास गायकवाड, अंजली बनसोडे, लक्ष्मण राऊत, योगेश राऊत, सुदर्शन मिरकुटे, नितेश मिरकुटे, सोमनाथ राऊत उपस्थित होते.

Post a Comment