Header AD

राज्यातील महिला अत्याचारा विरोधात भाजपा महिला मोर्चाची निदर्शने


महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनवण्याची केली मागणी...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  महाराष्ट्र राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून राज्य सरकार महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शने केली. महिला मोर्चाच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी यांच्या नेत्तृत्वाखाली याठिकाणी आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देत महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग व हत्याकांड यांचे सत्र सुरुच आहे त्यातच कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविंड सेंटर व हॉस्पिटल मध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाच्या सत्र सुरूच आहे.
भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला आहे. पीडित महिलांच्या कुटुंबियांना स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊनक वेळोवळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठवले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप भाजपाने केला असून महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनवण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली असल्याची माहिती महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांनी दिली. 

राज्यातील महिला अत्याचारा विरोधात भाजपा महिला मोर्चाची निदर्शने राज्यातील महिला अत्याचारा विरोधात भाजपा महिला मोर्चाची निदर्शने Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads