ठाण्यातल्या डॉक्टर टीमने महाराष्ट्रा तील दुसरे लहान आतड्याचे प्रयत्यारोपण पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात यशस्वीपणे पार पाडले
पुणे | विशेष प्रतिनिधी : ज्या लोकांचे आतडे निष्क्रीय झाले असेल त्यांच्यासाठी लहान आतड्याचे प्रत्यारोपण विचारात घेतले जाते. हे एक तर शस्त्रक्रियेदरम्यािन लहान आतड्याची जास्त झीज झाल्याने होते किंवा विविध वैद्यकीय कारणाांमुळे पोषक तत्वांचे अपुरे शोषण झालल्याने ही समस्या उद्भवते. शरीरातील अंतर्गत शिराांमध्ये पोषण म्हणजेच पॅरेंटरल नुट्रिशन (PN) मध्ये अडथळे आल्यािस किंवा PN ची स्थिती शक्य नसल्यास अशा रुग्नांसाठी विशेषत: प्रत्यारोपण आवश्यक असू शकते.
पुण्यातील ३४ वर्षीय व्यक्तीच्या संपूर्ण लहान आतड्याला गँगरीन झाले होते,जे
शस्त्रकियेद्वारे काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे रुग्णाला पोषण आणि आरोग्य व्यवस्थिथ ठेवण्यात अडचण येत होती. त्याचे शरीर आहारातून पोषक तत्वे शोषून घेण्यास असमर्थ ठरू लागले. त्यामुळे त्याला इंट्रा व्हेनस नुट्रिशन चा आधार घ्यावा लागला होता आणि वारंवार रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. योग्य दाता मिळण्यासाठी रुग्णाने ६ महिने प्रतीक्षा केली.
पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पीटल महाराष्ट्रतील हे एकमेव हॉस्पीटल आहे, जेथे आतापर्यंत लहान आतड्यािवरील प्रत्यारोपण यशस्वी केले आहे. रुगणाला एका तरुण मृत दात्याकडून सुमारे ४०० से.मी आकाराचे संपूर्ण लहान आतडे मिळाले व रुग्णावर यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले.
या शस्त्रकियेबद्दल बोलताना, ज्युपिटर हॉस्पीटलचे डॉ. गौरव चौबळ म्हणाले, “आतड्यावरील प्रत्यारोपणासाठी योग्य दाता शोधणे हे मोठे आव्हान होते. प्रत्यारोपण प्रक्रियेचे यश बहुताांश वेळा दात्याच्या निवडावर अवलंबून असते, त्यामुळे त्याचे योग्य परीक्षण घेऊन आवश्यक काळजीही घ्यावी लागते. ”
डॉ. चौबळ यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया यशस्विरित्या पार पडली. ते ज्युपिटर हॉस्पीटल मधील चीफ मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. या प्रत्यारोपणामुळे रुग्णाला अन्न पचवीण्याची क्षमता पुन्हा मिळाली तसेच तो सामान्य जीवन जगु
शकेल.
ठाण्यातल्या डॉक्टर टीमने महाराष्ट्रा तील दुसरे लहान आतड्याचे प्रयत्यारोपण पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात यशस्वीपणे पार पाडले
Reviewed by News1 Marathi
on
October 08, 2020
Rating:

Post a Comment