केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार कायद्या विरोधात काँग्रेस मध्यवर्ती कार्यालया बाहेर सत्याग्रह करण्यात आला
■ठाणे काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निम्मित केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार कायद्या विरोधात काँग्रेस मध्यवर्ती कार्यालया बाहेर सत्याग्रह करण्यात आला ...
ठाणे | प्रतिनिधी : भारतातील नागरीक कोरोनाचा सामणा करत असतानाच आलेली दुष्काळी परिस्थिती असे एका मागून एक आघात सहन करीत असताना केंद्रातील भा.ज.पा.सरकारने शेतकरी,मजूर वर्ग व्यापारी असघटित कामगार यांना सावरायला पाहिजे असताना शेतकरी वर्ग संकटात कसा येईल,कामगार कसा अडचणीत येईल अशा प्रकारचे विधेयक एकधिकार शाहीने मंजूर करून घेतले यातच केंद्र सरकारचे एकंदरित खरे धोरण स्पष्ट होते असा आरोप ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांनी केला.
अ.भा.काॅग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व म.प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त "हुतात्मा दिन" या दिवशीच संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने ""कीसान अधिकार दिन ""पाळण्यात आला,ठाणे शहर काँग्रेसच्या वतीनं शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय परिसरात केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्या विरोधात" सत्याग्रह करण्यात आला.
सोशल डीस्टस्टींगचे पालन करून या सत्याग्रहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव के.वृषाली,महिला अध्यक्षा शिल्पा सोनोने,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर,प्रदेश काँग्रेस सदस्य प्रदिप राव,सुखदेव घोलप,जे.बी.यादव,महेद्र म्हात्रे,रविंद्र कोळी,जानबा पाटील,शिरीष घरत,विजय बनसोडे,ब्लाॅक अध्यक्ष संदिप शिंदे,राजू हैबती,नरेंद्र कदम,राजू शेट्टी,राहुल पिंगळे,धर्मवीर मेहरोल,बाबू यादव,रेखा मिरजकर,रामभाउ परदेशी,सुप्रिया पाटील,बाबा शिंदे,मनोज डाकवे,भोलेनाथ पाटील,संजय शिंदे,स्वप्निल कोळी,उमेश केसरकर,अँड.दरम्यान सिंग,उमेश केसरकर,चंद्रकात मोहीते,पप्पू सिंग,अक्रम बन्नेखान,युवक काँग्रेसचे स्वप्नील भोईर,बाळासाहेब निर्मळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment