नवरत्नांचा नवरात्र घट नारी शक्तीचा सन्मान
कल्याण | कुणाल म्हात्रे : नवरा उत्सवात आई भवानी मातेचा जागर करताना नऊ दिवस समाजातील वेगवेगळ्या स्तरातील स्त्रियांबाबतच्या मुलाखाती, तसेच त्यांची जीवनगाथा सांगणाऱ्या कथा लक्ष्मी चित्र च्या यूट्यूब चँनल तर्फे प्रसारित करण्यात आल्या. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
समाजामध्ये अनेक अशा स्त्रिया ज्यांनी हाल-अपेष्टा सहन करत जीवनाशी संघर्ष करत आपला संसार उभा केला. त्याचबरोबर सामाजिक जाणीव ठेवून सामाजिक भान ठेवून आपलं काम केले आहे. अशा स्त्रियांचा गौरव व्हावा, समाजाला त्यांचा परिचय व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये लीला इंगळे, लक्ष्मीबाई पाटील, वैशाली साळवी, अनन्या म्हात्रे, संस्कृती म्हात्रे, सुचिता आरज, रोहिणी लोकरे, रजनी लोहकरे, छाया घाटगे, सविता येवतकर आदी महिलांच्या कथा, मुलाखती सादर करण्यात आल्या.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन अजय पाटील यांची असून या संघर्षमय जीवनाचे रेखाटन मनीषा गामणे, विद्या शिर्के, नीता मोरे, सरीता काळे या शिक्षकांनी केलेले आहे. छायाचित्रण विशाल ढेंगळे,एडिटिंग आकाश पाटील, संगीत आदर्श पाटील यांनी केले आहे. नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम लक्ष्मी चित्राच्या यूट्यूब चँनल वरती प्रसारित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची निर्मिती अजिता पाटील यांनी केली आहे.

Post a Comment