Header AD

चिपळूण भाजपा शिष्ट मंडळाने आगार व्यवस्थापक रणजित राजे शिर्के यांची घेतली भेट


ग्रामीण भागातील बंद असलेल्या एसटी सुरू करण्याबाबत दिले निवेदन...


चिपळूण | प्रतिनिधी  :  कोरणा परिस्थितीमुळे गेली काही महिने ग्रामीण भागातील एसटी सेवा बंद होती. मात्र, आता लॉकडाऊन नंतर अनलॉक सुरू आहे. या कालावधीत बऱ्याच वाहतूक सेवा सुरू झाल्या आहेत. यामध्ये अजूनही चिपळुनात ग्रामीण भागात तितकीशी एस. टी. सेवा सुरू नसल्याने ग्रामीण भागातील लोकांसमोर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे भाजपा चिपळून तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने येथील आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील बंद एसटी सेवा सुरू करण्यासंदर्भात नुकतेच निवेदन दिले. 


ओवळी गावचे भाजपा बुथ अध्यक्ष रमेश शिंदे यांनी ग्रामस्थांच्या मागणी नुसार चिपळूणहून  १ वा. सुटणारी चिपळूण ओवळी एस.टी. सुरू करण्यासाठी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांना ग्रामस्थांच्या सहींचे निवेदन दिले होते. तसेच इतर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी गावातील बंद असलेली एसटी सुरू होण्यांसदर्भात लक्ष वेधण्यात यावे, अशी मागणी केली होती.  ग्रामस्थांची होणारी अडचण लक्षात घेऊन भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांनी  शिष्टमंडळासमवेत चिपळूण आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांची भेट घेऊन ओवळी व इतर ग्रामीण भागातील बंद असलेल्या एसटी सुरू करण्याबाबत चर्चा केली.  तसेच १६ आॅक्टोंबर रोजी विरबंदर एस.टी. सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.  यानुसार विरबंदर एसटी सुरू केल्याबद्दल आगार व्यवस्थापक राजेशिर्के यांचे भाजपा चिपळूण तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. 


चिपळूण आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी ओवळी एसटी सुरू करणेबाबत आश्वासन दिले. तर ग्रामीण भागातील बंद असलेली एस. टी. सेवा सुरू करण्याबाबत लवकरच प्रयत्न केले जातील, असे सांगितले. यावेळी चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व नगरसेवक परीमल भोसले, महेश दिक्षित, भाजपा युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रणय वाडकर, चिपळूण तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुयश पेठकर आदी उपस्थित होते.
चिपळूण भाजपा शिष्ट मंडळाने आगार व्यवस्थापक रणजित राजे शिर्के यांची घेतली भेट चिपळूण भाजपा शिष्ट मंडळाने आगार व्यवस्थापक रणजित राजे शिर्के यांची घेतली भेट Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads