शाळेची फी भरण्यास कालावधी आणि सवलती मिळण्यासाठी शिवसेनेचे शाळांना निवेदन
डोंबिवली | शंकर जाधव : शिवसेना उपतालुकाप्रमुख भगवान शांताराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोढा हेवन निळजे व पलावा सिटी मधील चन्द्रेश मेमोरियल स्कुल, रामभाऊ भिसे शाळा, आदर्श विद्यालय, लोढा वर्ल्ड स्कुल आणि पवार पब्लिक स्कुल या शाळांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनातून शाळांना विनंती करण्यात आली की शाळेतील विद्यार्थ्यांना फी भरण्याच्या संदर्भात शासनाकडून दिलेल्या आदेशानुसार कालावधी व सवलत देणे व तसेच आरटीई या शासनाच्या नियम लागू केलेल्या कायद्याचा लाभ गरिब विद्यार्थी यांना मिळवून देण्याबाबत सहकार्य करावे.
सदर निवेदन देण्याकरिता युवासेना कल्याण विधानसभा संघटक मुकेश नाना भोईर, शिवसेना विभाग प्रमुख सुरेश कदम, अमोल भोगले, उपविभागप्रमुख रुपेश पवार, ककाटी , शाखाप्रमुख सुभाष पाटील,जगन्नाथ पगडे, भीमराव सोनावणे, उपशाखा प्रमुख सतिश अमरे, विलास कांबळे,रवी गायकवाड, युवासैनिक प्रसाद रसाळ , शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment