ठामपा नगरसेवक शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे कोरोना मुक्त
ठाणे | प्रतिनिधी : कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना इतरांच्या संपर्कात येऊन कोरोना ची लागण नगरसेवक व महापालिका शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांना सुद्धा झाली तब्बल चोवीस दिवस रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर मात केली.शुक्रवारी त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला.
त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी त्याचे नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले रेपाळे यांनी सर्व प्रथम मुलांना जवळ घेतले आणि सांगताना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांनी फोन वरून सतत विचारपूस करत होते पालक मंत्री एकनाथ शिंदे रोज फोन वरून तब्बेतीची माहिती घेत होते आणि नागरिक ही फोन च्या माध्यमातून विचारणा करीत होते या सर्वांचे मनपूर्वक आभार विकास रेपाळे यांनी मानले आणि गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Post a Comment