Header AD

शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२० : चढ-उताराच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी आज सलग सातव्या दिवशी तेजी दर्शवली. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही आज उच्चांकी स्थितीत सुरु झाले, त्यानंतर काही काळ अस्थिरता दर्शवल्यानंतर अनिर्णित स्थितीत विसावले. आयटी आणि फार्मा क्षेत्राने आज नफा कमावला. निफ्टीने ०.१४% किंवा १६.७ अंकांनी वाढ घेतली व तो ११,९३०.९५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी सेन्सेक्सने ८४.३१ अंकांनी किंवा ०.२१% नी वाढ घेतली व तो ४०,५९३.८० अंकांवर स्थिरावला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात लार्जकॅप आणि मिडकॅप सेगमेंटमध्ये, लार्सन अँड टर्बो इन्फोटेक (११.९४%), इंडियाबुल्स व्हेंचर्स (९.४२%), कॉफोर्ज (८.१६%), डॉ. लाल पॅथलॅब्स (६.०७%) आणि टाटा एलक्सी (५.८५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले तर वेदान्ता (२०.४३%), युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (१४.०४%), आरती ड्रग्ज (१०%), रिलायन्स होम फायनान्स (९.०%) आणि फ्युचर रिटेल (८.९४%) हे निफ्टीतीस टॉप लूझर्स ठरले.

क्षेत्रीय व्यापार पाहता, आयटी आणि फार्मा क्षेत्र हिरव्या रंगात स्थिरावले तर मीडिया, पीएसयू बँक आणि रिअॅलिटी स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली.


निफ्टी आयटी आणि फार्मा: निफ्टी आयटीतील सर्व १० स्टॉक्सनी वृद्धी दर्शवली, याचे नेतृत्व एलअँडटी इन्फोटेकने केले. लाभ मिळालेल्या इतरांमध्ये कोफोर्ज (८.१६%), माइंडट्री (३.८६%), इन्फोसिस (२.२९%) आणि एचसीएल (१.१७%) यांचा समावेश होता. तर फार्मा क्षेत्रात बायकॉन (२.३८%), लुपिन (१.६८%), टॉरेंट फार्मा (१.४७%), सिपला (१.३१%) आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (१.३१%) यांनी नफ्याचे नेतृत्व केले. अल्केम लॅब्ज (०.५९%) आणि अरबिंदो फार्मा (०.०५%) हेच निफ्टीतील स्टॉक्स केवळ लाल रंगात स्थिरावले.


निफ्टी मीडिया अँड पीएसयू बँक: निफ्टी मीडियातील १२ पैकी ९ स्टॉक्स लाल रंगात स्थिरावले. या नुकसानीचे नेतृत्व झी एंटरटेनमेंट (५.३४%), सन टीव्ही (२.२७%), डिश टिव्ही इंडिया (२.२३%) आणि आयनॉक्स लेजर (१.६९%) नी केले. हॅथवे केबलने ४.८९% ची वृद्धी घेत नफ्याचे नेतृत्व केले. तर जागरण प्रकाशनने २.३४% नी वृद्धी घेतली. पीएसयू बँक क्षेत्रात फक्त पंजाब सिंध बँक आणि एसबीआय अनुक्रमे १.४% आणि ०.२% ची वृद्धी घेत सकारात्मक स्थितीत स्थिरावले. आयओबी आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स स्थिर राहिले.

भारतीय रुपया: सुरुवातीच्या व्यापारी सत्रात डॉलरच्या विरोधात भारतीय रुपया स्थिर होता. मात्र सत्राच्या अखेरीस डॉलर मजबूत स्थितीत राहिले तर रुपयाने ७३.३० रुपयांचे मूल्य गाठले.


चीनमुळे आशियाई बाजारपेठेत वृद्धी: आशियाई बाजारातील नफ्याचे नेतृत्व चिनी स्टॉक्सनी केले. दुसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या निरंतर सुधारणेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष होते. तथापि, अमेरिकेच्या प्रोत्साहनाने स्थिर डॉलरसह नफ्यावर मर्यादा आल्या तसेच युआनचाही नफा मर्यादित राहिला. जपान बाहेरील एपीएसी रिजनमधील एमएससीआयचा ब्रॉडकास्ट निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. त्यामुळे २-१/२ वर्षांची उच्च पातळी गाठली. चिनी ब्लू चिप स्टॉक तसेच हँग सेंग निर्देशांकाच्या २ टक्के वाढीने नफ्याला आधार मिळाला. गुंतवणुकदार कॉर्पोरेट उत्पन्नाविषयी चिंतेते असल्याने जपानच्या निक्केईनेही ०.३ टक्क्यांची घसरण घेतली.

शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads