भिवंडीत पोलिओ मोहिमेसाठी विशेष जनजागृती
भिवंडी | प्रतिनिधी : देशभरातुन पोलिओचे उच्चाटन करण्या साठी प्रत्येकवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्लस पोलिओ मोहीम राबविण्यात येते त्यानंतर ही बहुसंख्य शून्य ते पाच या वयोगटातील पोलिओ बाधित रुग्ण आढळत असल्याने महाराष्ट्रातील एमएमआर विभागातील महानगरपालिका क्षेत्रात १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान विशेष प्लस पोलिओ लसीकरण राबविली जाणार असून त्यासाठी भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविली असून त्याचा शुभारंभ महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला .या प्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ .के जी खरात ,डॉ.जयवंत धुळे, अधिकारी सुभाष झळके ,बाळाराम जाधव ,मिलिंद पळसुले आदी उपस्थित होते .

Post a Comment