युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जागृती सप्ताहाचे आयोजन
मुंबई, २८ ऑक्टोबर २०२० : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या मार्गदर्शनानुसार, ‘व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परस इंडिया’ (सतर्क भारत, समृद्ध भारत) या संकल्पनेवर जागृती सप्ताह साजरा केला जात आहे. तरुण, नोकरदार, त्यांचे कुटुंबीय, बीसीज आणि मोठ्या प्रमाणावर लोकांसाठी, विशेषत: ऑनलाइन माध्यमांद्वारे या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रम/वेबिनार्स बँकेमार्फत आयोजित करण्यात आले आहेत. या संकल्पनेच्या व्यापक प्रसारासाठी सोशल मीडियाचाही जास्त वापर केला जात आहे. देशभरातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आणि कार्यालयात २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान हा जागृती सप्ताह पाळला जाईल.
आज युनियन बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल ऑफिसमध्ये व्यवस्थपकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजकिरण राय जी यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना डिजिटल मोडद्वारे अखंडतेची प्रतिज्ञा दिली. यानिमित्त श्री राजकिरण राय जी यांनी प्रीव्हेंटिव्ह व्हिजिलन्स या ई लर्निंग कोर्सचे उद्घाटनही केले.

Post a Comment