Header AD

मुरबाडमधील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्याची गरज खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांचा पाहणीदौरा


मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली...मुरबाड  |  प्रतिनिधी  : परतीच्या अस्मानी पावसाने मुरबाड तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदतीचा दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाचे कोणताही स्त्रोत राहिलेला नाही, याकडे दोन्ही नेत्यांनी लक्ष वेधले.

मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाताचे पिक घेतले जाते. प्रामुख्याने भाताच्या पिकावरच शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. भाताची विक्री केल्यानंतर मिळालेल्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह होतो. अशा परिस्थितीत अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे कापणी होत असलेले व कापून ठेवलेले भाताचे पिक मातीमोल झाले. त्यामुळे मुरबाडमधील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधण्याबरोबरच दिलासा देण्यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्याचा दौरा केला. 


तालुक्यातील पोटगाव, बरडपाडा, घोरले. किशोर आणि वांजळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तेथील नुकसानीची पाहणी करून तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांबरोबरही चर्चा केली. तसेच महसूल यंत्रणेला लवकरात लवकर पंचनामे आटोपण्याची सुचना केली.
परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत मुरबाडमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. सरकारी मदतीशिवाय येथील शेतकरी सावरू शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली. मुरबाडप्रमाणेच संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.


कोरोनाच्या आपत्तीने शेतकरी अडचणीत आले. आता अस्मानी पावसामुळे दुसरे संकट निर्माण झाले आहे, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यामुळे शासकिय यंत्रणांनी पंचनाम्यात वेळ वाया न घालविता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर थेट भरपाई जमा करावी, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली. या दौऱ्यात भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव यांचीही उपस्थिती होती.


मुरबाडमधील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्याची गरज खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांचा पाहणीदौरा मुरबाडमधील उद्ध्वस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्याची गरज खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांचा पाहणीदौरा Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads