कोकण रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंता उदय पवार सी.एम.डी. अॅवार्डने सन्मानित
चिपळूण | प्रतिनिधी : कोकण रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंता उदय पवार सी. एम. डी. पुरस्काराने नुकतेच सन्मानित झाले आहेत. या पुरस्काराबद्दल उदय पवार यांच्यावर कोकण कोकण रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोकण रेल्वेच्या अगदी सुरुवातीच्या कन्स्ट्रक्शन काळाच्या प्रतिकूल सेवेत दाखल झालेल्या चिपळूण तालुक्यातील संभाजीनगर, सती येथील कोकण रेल्वेचे अभियंता उदय पवार यांनी त्यांच्या कोकण रेल्वेच्या २९ वर्षाच्या सेवेच्या कालावधीत केलेल्या वैशिष्ट्यपुर्ण कामांमुळे कोकण रेल्वेत अतिशय मानाचा समजला जाणारा सी.एम.डी अॅवार्ड जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराने नुकतेच कोकण रेल्वे स्थापना कार्यक्रमाच्या दिवशी वरिष्ठांच्या हस्ते सन्मानित झाले आहेत. डायरेक्टर स्तरावर दोनवेळा सन्मान झाल्यानंतर कामातील नियमितता, शिस्त, विशिष्ट कार्यपद्धती या निकषावर रेल्वे प्रशासनाकडून त्यांची निवड करण्यात आली.
पोफळी पवारवाडी येथील कोयना प्रकल्पातील लोकप्रिय व्यक्तीमत्व व मराठा समाजासाठी दीर्घकाळ कार्यरत सखाराम पवार यांचे ते सुपुत्र असून, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचे ते जावई आहेत. त्यांनी मंदार शिक्षण संस्थेतून तांत्रिक प्रशिक्षण पुर्ण करत कोकण रेल्वेत सेवेस प्रारंभ केला.
अभियंता उदय पवार यांनी चिपळूण, खेड, रत्नागिरी आदी स्थांनकाबरोबरच विविध प्रकल्पस्थळी तांत्रिक जबाबदारी पार पाडली आहे. वेळप्रसंगी कौंटुबिक जबाबदाऱ्या बाजुला ठेवत केवळ आपल्या निष्ठेने जबाबदारीकडे लक्ष देणारे वरिष्ठ अनुभाग अभियंता म्हणून ते रेल्वे कर्मचार वर्तुळात परिचित आहेत. या अॅवार्डबाबत घोषणा होताच पवार, चव्हाण, यादव, शिर्के कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment