Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा २८० नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू
एकूण ४४,०६४ रुग्ण तर ८५७ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ४४ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या २८० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या २८० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,०६४ झाली आहे. यामध्ये ३४४४ रुग्ण उपचार घेत असून ३९,७६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २८० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६४कल्याण प  ६५डोंबिवली पूर्व ८८डोंबिवली प- ४८मांडा टिटवाळा  तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.  डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून११ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून५ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा २८० नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू  कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४४ हजारांचा टप्पा २८० नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads