भाजपच्या वतीने मोफत बेसिक कंप्यूटर प्रशिक्षण
डोंबिवली | शंकर जाधव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ( आत्मनिर्भय भारत ) अंतर्गत भाजपच्या वतीने मोफत बेसिक कंप्यूटर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.५४ ठाकूरवाडी जुनी डोंबिवली येथे भाजप डोंबिवली पश्चिम मंडल युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्यावतीने हे प्रशिक्षण सुरु होणार आहे.१८ वर्षावरील महिलांसाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.जुनी डोंबिवली येथील बावडी समोर, भारतमाता शाळेच्या बाजूला,शाळा क्र.६६ पु.भा.भावे शाळा येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी महिलांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिका माहितीसाठी गणेश निंबाळकर -९८२१६१६२१५ यावर संपर्क साधावा

Post a Comment