Header AD

कल्याण डोंबिवलीत ३९२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यूएकूण 
४३,७८४ रुग्ण तर ८५० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४८१ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३९२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ३९२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४३,७८४ झाली आहे. यामध्ये ३५७६ रुग्ण उपचार घेत असून ३९,३५८  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३९२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५२, कल्याण प – १२२, डोंबिवली पूर्व ११८, डोंबिवली प- ७७, मांडा टिटवाळा – १७, तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 


डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण डोंबिवलीत ३९२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ३९२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads