Header AD

भिवंडीत मैल सफाई कर्मचाऱ्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणाचे आयोजन
भिवंडी  |  प्रतिनिधी  :  महानगरपालिका स्तरावर स्वच्छतेचे काम करीत असताना मैल सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असते परंतु हे काम करणारे कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक सुरक्षे सह हे काम करीत असताना अपघात घडत असतात ,नव्हेच तर देशात दर पाच दिवसात एका सफाई कर्मचाऱ्याचा मैल सफाई अथवा ड्रेनेज मध्ये काम करताना गुदमरून मृत्यू पावतात म्हणून या कामगारांना शास्त्रोक्त प्रशिक्षण अत्यावश्यक असून त्यासाठी पुणे येथील कॅम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून भिवंडी महानगरपालिकेतील 


२ शे मैल सफाई कर्मचारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले असून या शिबिराचा शुभारंभ आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी मुख्य स्वच्छता आरोग्य अधिकारी अशोक संख्ये ,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे ,कॅम फाऊंडेशनच्या प्रमुख डॉ स्मिता सिंग ,मुख्य सल्लागार एम कृष्णा उपस्थित होते

        


स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भिवंडी महानगरपालिकेस राष्ट्रीय पातळीवर २६ वे तर महाराष्ट्र पातळीवर ७ क्रमांकाचे मानांकन मिळाले त्यामध्ये महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी यांनी केलेली सेवा महत्वाची असल्याने त्यांचा गौरव करीत असताना आपण आपले काम करीत असताना स्वतःची व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या कामाचे प्रशिक्षण गरजेचे असल्याचे सांगत या कामी कॅम फाऊंडेशन चे विनामूल्य सहकार्य मिळत असल्या बद्दल सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांनी आभार व्यक्त केले .


महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छ सर्वेक्षणास प्रारंभ होत असताना त्यांच्या पूर्वसंध्येस मैल सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळते हा दुग्धशर्करा योग्य असून स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी महानगर पालिका प्रशासनाची असली तरी कर्मचाऱ्यांनी सुध्दा गाफील राहून काम न करता स्वतः सह कुटुंबियांची काळजी घेत आपले कर्तव्य पार पडावे असे आवाहन जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांनी केले .कॅम कंपनीचे सल्लागार एम कृष्ण यांनी शौचालय स्वच्छता हे समाजाकडून दुर्लक्षित असलेले काम जरी असले तरी त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९ नोव्हेंबर हा शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो त्यामुळे त्याचे महत्व मोठे आहे असे स्पष्ट करीत त्यासाठी प्रत्येकाने शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन योग्य ती उपकरणे वापरणे गरजेचे असल्याचे नमूद केले .या प्रशिक्षण शिबिरात ३५ कर्मचाऱ्यांची एक तुकडी करून २०० कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामध्ये त्यांच्या कामाचे मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती कॅम फाऊंडेशनच्या प्रमुख डॉ स्मिता सिंग यांनी दिली.


या कार्यक्रम दरम्यान मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षेसाठीच्या किट्स चे वितरण करण्यात आले तर या कार्यक्रमास मैल स्वच्छता निरीक्षक नितीन चव्हाण ,सचिन वनमाळी ,दिगंबर जाधव,संतोष जाधव ,हर्षल मोरे,भारत तांबे यांसह स्त्री पुरुष कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोएब मोमीन यांनी केले तर आभार प्रदर्शन कॅम फाऊंडेशन चे शिवाजी पाटील यांनी केले.
भिवंडीत मैल सफाई कर्मचाऱ्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणाचे आयोजन भिवंडीत मैल सफाई कर्मचाऱ्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षणाचे आयोजन Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

■मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील एचपीसीएलच्या नवीन चार्जिंग स्टेशनला दिली भेट ... मुंबई, ८ मार्च २०२१ :  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमजी मो...

Post AD

home ads