Header AD

अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे डोंबिवलीत निदर्शने
डोंबिवली | शंकर जाधव  :  अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती कल्याण – डोंबिवली शहराच्या वतीने सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.उत्तर प्रदेश येथील हाथरस मध्ये मनीषा वाल्मिकी या तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात देशभरात निदर्शने होत आहे. डोंबिवलीतही समितीने निदर्शने करून महिलांच्या सुरक्षतेबाबत सरकारने योग्य ती निर्णय आणि कडक कायदे करा मनीषा वाल्मिकीला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी समितीने केली.

 


अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे संघटनप्रमुख डॉ.अमित दुखंडे, नियोजन प्रमुख पॅथर आनंद नवसागरे,पूर्वतयारी प्रमुख संजय गायकवाड यांसह राहुल नवसागरे,नीतू गायकवाड, मंगेश जाधव, ज्योती गवई यासह अनेकांनी निदर्शने केली.यावेळी महिलांवरील अत्याचाराविरोधात केंद्र सरकारने कडक कायदे करावे,आणि मनीषा वाल्मिकी या तरुणीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. निदर्शनाच्या वेळी रामनगर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने रामनगर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.मोरे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे डोंबिवलीत निदर्शने अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे डोंबिवलीत निदर्शने Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads